इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- सांगली जिल्हाधिकारी यांचे सेवानिवृत्त स्विय सहाय्यक हाजी शहाहुसेन दाऊदसाहब शेख (शाह साहब) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ७२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. मितभाषी, प्रेमळ, आपल्या स्वभावाने सर्वांना आपलेसे करणारे, मदतीचा हात सदैव पुढे ठेवणारे, सतत हसतमुख स्वभावाचे म्हणून सर्व परीचीत होते. सोलापूर व मिरज येथे प्रांताधिकारी यांचे स्विय सहाय्यक म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केले होते. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हाजी एम. डी. शेख यांचे थोरले बंधू व दैनिक सकाळ पत्रकार शौकत तांबोळी यांचे थोरले मामा होते.
फोटो - हाजी शहाहुसेन दाऊदसाहब शेख
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा