Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २९ मे, २०२४

*तुळजापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे उर्वरित पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी-- महाविकास आघाडीची मागणी*

 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448*


अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे तुळजापूर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे उवरित पंचनाचा करून तात्काळ मदत करावी अशी मागणी तुळजापूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूरचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की तुळजापूर तालुक्यामध्ये विशेषतः धनेगाव, कुंभारी मंगरूळ व इतर गावामध्ये मागील तीन दिवस्रामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे जीवीतहानी तसेच प्रचंड प्रमाणावर घरांची पडझड झाली झाडे उन्मळून पडली फळबागांचे नुकसान झाले अशा प्रकारे शेतकरी व इतर कूटुंबाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सदरील नुकसानीचे काही ठिकाणी पंचनामे झालेले आहेत, परंतु आणखी बऱ्याच ठिकाणचे पंचनामे होणे बाकी असून त्या ठिकाणचे पंचनामे तात्काळ करून व नुकसानग्रस्त शेतकरी व इतर लोकांना तात्काळ मदत होणे अत्यावश्यक आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस तोंडावर आलेले असून ज्यांची घरे उध्वस्त झालेल्लो आहे, अशा लोकांचा संसार उघडयावर आला असून त्यांना तातडीने निवारा उभारणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांना शक्य तेवढ्या तातडीने शासकीय मदत मिळणे आवश्यक आहे. तसेच पेरणीचे दिवस जवळ आले असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पेरणीसाठी आर्थिक मदत होणे गरजेचे आहे. तरी उर्वरित पंचनामे तात्काळ करून घ्यावेत व लवकरात लवकर आर्थिक मदत करण्यात यावी अशी या निवेदनाद्वारे तुळजापूर तालुका महाविकास आघाडी च्या वतीने आग्रहाची मागणी करण्यात आली आहे



तसेच २०२३ चा पिकविमा सरसकट शेतकऱ्यांना देण्यात यावा, तसेच पेरणीचे दिवस जवळ आल्याने शासनाने चि-बियाणे, खते देण्यात यावे तसेच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने चारा उपलब्ध निर्माण करून दयावा तसेच तुळजापूर तालुक्यातील शेतीचे विजबिल माफ करण्यात यावीत इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा