Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १९ जून, २०२४

*बार्शी येथे 1500 रुपये लाच स्वीकारताना पुरवठा शाखेतील डाटा एन्ट्री ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात*

 


*संपादक ---हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो ;-9730 867 448

बार्शी जिल्हा सोलापूर येथील तहसील कार्यालयातील पुरवठा शाखे मधील

डाटा इंन्ट्री ऑपरेटर श्रीमती वर्षा भगवान काळे, रा. मु.पो. कांदलगांव रोड, सायली हॉटेल शेजारी बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर यांनी तक्रारदार यांचेकडे १५००/- रुपये लाचेची मागणी करुन १५००/- रुपये लाच रक्कम स्विकारले वरुन लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर युनिट पुणे परी क्षेत्रात कडून बार्शी शहर पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करणेची प्रक्रिया सुरु आहे

याबाबत सविस्तर माहिती

यातील तक्रारदार यांच्या पिवळ्या रेशनकार्डावर धान्य मिळत नसल्याने तक्रारदार यांनी बार्शी तहसिलदार कार्यालय पुरवठा शाखा येथील डाटा इंन्ट्री ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांना भेटून लेखी अर्ज दिनांक १४.०६.२०५२४ रोजी केला होता. सदर वेळी डाटा इंन्ट्री ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांनी अर्ज न स्विकारता तक्रारदार यांना १५००/- रुपयेची लाचेची मागणी करुन अर्ज व १५००/- रुपये घेवुन दि. १८.०६.२०२४ रोजी बोलावले होते. त्यावरुन दिनांक १८.०६.२०२४ रोजी डाटा इंन्ट्री ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांनी पडताळणी कारावाईमध्ये तक्रारदार यांचेकडे पिवळ्या रेशनकार्डावर धान्य सुरु करण्यासाठी १५००/- लाचेची मागणी करुन १५००/- रुपये डाटा इंन्ट्री ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांनी स्वतः स्विकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यावरुन बार्शी शहर पोलीस

ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.       



  या कामी मार्गदर्शन अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग पुणे अमोल तांबे ,- अप्पर पोलिस अधिक्षक लाच प्रतिबंधक विभाग पुणे डॉक्टर शितल जानवे यांनी काम पाहिले 

सापळा पथक मध्ये पोलीस उप अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग सोलापूर -गणेश कुंभार, पोलीस अंमलदार -शिरीष कुमार सोनवणे, पोलीस नाईक -संतोष नरोटे ,पोलीस शिपाई- रवी हाटखिळे, चालक- पोलीस शिपाई- शाम सुरवसे, सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली


तरी



लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणा-या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर.

संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in

ई मेल www.acbwebmail@mahapolice.gov.in ऑनलाईन तक्रार अॅप acbmaharashtra.net

संपर्क टोल फ्री क्रमांक - १०६४

दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८

व्हॉटस अॅप क्रमांक- ९९३०९९७७००

/ पोलीस उप उप आयुक्त

(गणेश कुंभार) पोलीस उपअधीक्षक

ब्यूरो

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा