Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १९ जून, २०२४

*तुळजाभवानी साखर कारखान्याने 5 जुलै 2024 पर्यंत शेतकऱ्यांची बिले न दिल्यास 8 जुलै रोजी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार ---अमोल शिवाजी जाधव*

 


*संपादक ---हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो ;-9730 867 448

श्री. तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना चालक शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल देत नसल्याने दिनांक 19/06/2024 रोजी जुने बस स्थानक तुळजापूर समोर शेतकऱ्यांच्या वतीने रार रोको करत असले बाबत.

दिनांक 24/04/2024 व 07/06/2024 रोजी निवदेनदिले होते त्ता अनुषंगाने 

 आजदि.19/6/2024 रोजी तुळजापूर येथील जुने बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यानंतर तुळजापूरचे तहसीलदार यांना आगामी उपोषणा संदर्भात निवेदन देण्यात आले ते खालील प्रमाणे



वरील विषयी संदर्भान्वये निवेदन सादर करतोत की, श्री. तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्याचे ऊसाचे बील मिळत नसल्याने येणाऱ्या खरीप पिकासाठी खत आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने कारखान्याचे स्थानिक अधिकारी यांच्याकडे चौकशी केली तरी फोन बंद करतात, तसेच टाळाटाळ करत आहेत. याबाबत संदर्भीय अर्जान्वये निवेदने दिले असताना त्याची दखल अद्यापपर्यंत प्रशासनाने घेतलेली नाही.

तरी सर्व शेतकऱ्यांना त्यांचे ऊसाचे बिल तात्काळ देण्यात यावे, याकरीता आज दिनांक 19/06/20 रोजी तुळजापूर येथे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जुने बस स्थानक तुळजापूर समोर रास्तारोको करण्यात आले माञ दिनांक 05/07/2024 रोजीपर्यंत शेतकऱ्यांचे ऊसाचे बील नाही दिल्यास दिनांक 08/07/2024 रोजी तुळजापूर येथील तहसिल कार्यालय समोर अमरण उपोषण करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे



 याप्रसंगी शहराध्यक्ष- सुधीर कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते- अक्षय परमेश्वर ,नगरसेवक- राहुल भैया खपले ,नवनाथ आप्पा जगताप ,शरद जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य -चंदूकाका डांगे ,शामराव माळी, समाधान ढवळे, अमोल गवळी, शेतकरी व कामगार वर्ग उपस्थित होते


उपोषणकर्ते व निवेदक-- अमोल शिवाजीराव जाधव रा. तुळजापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा