*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
नालंदा बुद्ध विहार माळशिरस येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नालंदा बुद्ध विहार माळशिरस व सेवा निवृत्त कृषी कर्मचारी सेवाभावी संस्था माळेवाडी अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब,गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्या बरोबर एक झाडाचे रोप ही देण्यात आले.या कार्यक्रमाला एनडीएमजे राज्य सचिव वैभव गीते सदाशिव देठे प्रशाला चांदापूरीचे अध्यक्ष कुमार लोंढे, विकास धाईंजे व सेवा निवृत्त कृषी कर्मचारी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र एकतपुरे, उपाध्यक्ष अरविंद पगारे,सचिव श्रीकांत कुलकर्णी,संचालक अशोक नरूटे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे नियोजन विकास धाईंजे यांनी केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा