*अकलुज ----प्रतिनिधी*
*शकूर ----तांबोळी*
*' टाइम्स 45 न्युज मराठी
(अकलूज) येथील सदाशिवराव माने विद्यालय येथे
राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री, जनसेवा संघटनेच्या माध्यमातून समाजसेवचा ठसा उमटविलेले सामाजिक क्रांतीचे प्रणेते माजी खासदार कै. प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. अमोल फुले सर यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . कै . प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या कार्याचा परिचय सहशिक्षक श्री .पवार पी.एन यांनी करुन दिला .याप्रसंगी उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, सर्वपर्यवेक्षक , शिक्षक प्रतिनिधी ,शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा