इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती प्रवीण माने यांचा शनिवार ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार वाजता पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालय येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत.
पक्षप्रवेशाने इंदापूर तालुक्यातील राजकारणाची गणिते बदलणार आहेत. विधानसभा २०२४ च्या निवडणुका काही महिन्यात होणार असून इंदापूर तालुक्यात तिहेरी लढतीचे चित्र निर्माण होणार आहे. प्रवीण माने यांच्या पक्षप्रवेशाने आगामी निवडणुक रंगतदार होण्याची शक्यता वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवीण माने यांनी अचानक सुप्रिया सुळे यांची साथ सोडत राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये पक्ष प्रवेश केला. प्रविण मानेंचा पक्षप्रवेश जबरदस्तीने करण्यास भाग पाडले असल्याची चर्चा इंदापुरात रंगल्या होत्या. आता मात्र प्रवीण माने यांनी यु टर्न घेऊन पुन्हा एकदा खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या बरोबरीनेच जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सदरच्या पक्षप्रवेशानंतर प्रवीण माने यांना आगामी इंदापूर विधानसभा निवडणुकीचा तरूण चेहरा म्हणून तिकीटाची घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा