*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
तुळजापूर तालुक्यातील
शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन व इतर अनुदान व सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन ,मंञालय -मुंबई यांंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याबाबात सविस्तर वृत्त असे कि
राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे. तसेच शेतकऱ्यांचे सन २०२० पासून अर्धवट विमा मिळालेला आहे. तसेच तुळजापूर तालुक्यामध्ये सन २०२३ चा विमा फक्त ५% लोकांना मिळालेला आहे. उर्वरीत विमा शेतकऱ्यांनी अँड्राईड मोबाईलवर तक्रार जिओ टॅकींग करून नोंदविलेली नसल्यामुळे देण्यात आलेला नाही. शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट असून शेतकऱ्याकडे मोबाईल घ्यायला पैसा कुठून येणार आहे. या अगोदर सन २०१४ ला बँकेत विम्याचा पैसा भरल्यानंतर शेतकऱ्याने त्याची तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांच्यामार्फत चौकशी व्हायची व त्यानुषंगाने शेतकऱ्याला एकरकमी विमा एप्रिल, मे महिन्याच्या दरम्यान मिळायचा. त्यामुळे शेतकऱ्यांना कधीही सावकाराकडे कर्ज मागणीची वेळ येत नव्हती व आत्महत्या अत्यंत अल्प होत होत्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे जवळपास ८० हजार कोटीचे देयके प्रलंबीत असून त्यामुळे शासकीय ठेकेदाराला आत्महत्येची वेळ आलेली आहे व बँका त्यांची प्रॉपर्टी जप्ती करून लिलाव करत आहेत.
तरी याचा गंभीर विचार करून शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन व इतर अनुदान व सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासंदर्भामध्ये आपण मा. अप्पर मुख्य सचिव, वित्त व नियोजन यांना निर्देश द्यावेत,अशी मागणी धैर्यशील पाटील यांनी निवेदनात केली आहे
माहितीस्तव प्रत सादर :
१) मा. अप्पर मुख्य सचिव, कृषि विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२) अप्पर मुख्य सचिव, वित्त व नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
३)मा. अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा