*अकलुज--प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालय येथे प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना हिमॅटाॅलाॅजी व क्लिनिकल प्रॅक्टिसेस हा प्राणीशास्त्र कौशल्य आधारित सर्टिफिकेट कोर्सचा शुभारंभ आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सचे संचालक प्रा.निलेशकुमार आडत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सुधा बनसोडे यांच्या उपस्थित होत्या.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा.आडत म्हणाले की,प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी हिम्याटोलॉजीच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात आजपासून करण्यात आली.प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर निम वैद्यकीय क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या कोर्सचे नियोजित केलेला आहे.रक्ताच्या विविध तपासण्या यावर आधारित या कोर्सची रचना करण्यात आलेली आहे.आजपर्यंत २०० विद्यार्थ्यांनी या कोर्सचा फायदा घेतला आहे. रोजच्या मानवी जीवनामध्ये आरोग्य विषयक होणा-या तक्रारीवर सुयोग्य उपचार होऊ शकतो.या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना रक्तगट तपासणे,रक्तातील हिमोग्लोबिन तपासणे,बी एम आर (बाॅडी मेटाॅबालीक रेट),बी.एम.आय.( बाॅडी माॅस इंडेक्स),ब्लड प्रेशर तपासणी, शुगर तपासणी इत्यादी कौशल्य या कोर्समध्ये शिकवली जाणार आहेत.हा कोर्स विद्यार्थ्यांना फार उपयुक्त व फायदेशीर आहे.हा कोर्स प्राणीशास्त्र विभागाकडून अभ्यासक्रमाच्या आधारे शिकवला जाणार आहे.
या कार्यक्रमाला प्रा.डाॅ.अश्विनी हेगडे,बी.एस्सी द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी प्राणीशास्त्र विभागातील प्रयोगशाळा परिचर जी.एस.लोंढे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा