*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर कार्यालयाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांची बदली होऊन त्या ठिकाणी संभाजी धोत्रे यांच्या नियुक्तीचे आदेश बांधकाम विभागाचे अवर सचिव द.व.खारके यांनी काढले असून या आदेशाला केराची टोपली दाखवत भ्रष्टाचारी असलेले संजय माळी यांनी अद्याप संभाजी धोत्रे यांना पदभार दिला नसल्याचा आरोप करत पुन्हा सोलापूरला येण्याचा अट्टाहास न करण्याचा सल्ला देत संभाजी धोत्रे यांना पदभार न दिल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूरच्या कार्यालयात साप सोडणार असल्याचा इशारा जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले की,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध्यक्ष अभियंता संजय माळी यांचा कार्यकाल संपलेला आहे. मात्र तरीही ते सोलापूर येथे थांबण्यासाठी मोठा अट्टाहास करत आहेत. संजय माळी यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची कामे अत्यंत बोगस व निष्कृष्ट दर्जाची झाली आहेत. मर्जीतील ठेकेदारांकडून टक्केवारी घेत मर्जीतील लोकांनाच यांनी कामे दिलेली आहेत. त्यामुळे अनेक ठेकेदार व इंजिनियर झालेले युवक बेरोजगार झाले आहे.
त्यामुळे अशा भ्रष्ट असलेल्या अधिकाऱ्याने सोलापुरात थांबण्याचा कोणता अभ्यास करू नये. आपला कार्यकाल पूर्ण झालेला आहे, त्यांनी सन्मानाने वरिष्ठ आदेश देतील तिथे जावावे आणि जाताना संभाजी धोत्रे यांना पदभार द्यावा. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात शेकडो साप सोडून आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गणेश व्हायभासे, राणा वाघमारे, शरद सपाटे, जयसिंग पाटील, भारत साळूंखे, राजू कणसे, केशव लोखंडे, केशव नागणे, निलेश पवार, अक्षय देवडकर, बिभीष्ण शिरसट, बालाजी तरंगे, हनुमंत कानतोडे, शरद एकाड, अजीज सय्यद, अतुल राऊत, रामराजे डोलारे यांच्या सह जनशक्तीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा