*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाराष्ट्रात बिहार पॅनर्ट राबवून मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी अजित पवार यांनी अमित शहांकडे केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.त्यांच्या या मागणीने शिंदे गटाचं टेन्शन वाढलंय. दरम्यान, या मागणीची चर्चा होत असतानाच शरद पवार गटाचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटकपक्षांना किती जागा मिळणार याबाबत रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, "एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला आहे".
"या सर्व्हेत अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत".
"भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय", असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय.
एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 10, 2024
"कर्जत_जामखेड संदर्भात तर "कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको", असं सांगितल्याने कर्जत_जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे", असंही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
अजितदादांनी अमित शहांकडे काय मागणी केली?
दुसरीकडे, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा आणि मला मुख्यमंत्रिपद द्या, अशी मागणी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रविवारी मुंबई एअरपोर्टवर महायुतीमधील महत्वाचे नेते आणि अमित शहांमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अजितदादांनी ही मागणी केल्याचं समजतंय. त्यांच्या या मागणीमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा