Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १४ मे, २०२५

*अक्षता पडल्या अन् सकाळी नवरीला झाली देवाज्ञा* *आनंदाच्या सोहळ्यानंतर- पराडे- गळगुंडे -परिवार आणि गावावर सकाळी पसरली शोककळा*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

...... .जीवनातील महत्त्वाचा मानला जाणारा लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नववधुला ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने प्राण सोडावा लागल्याची घटना बाभुळगाव (ता माळशिरस ) येथे पराडे -गळगुंडे या परिवारांत हृदय पिळवून टाकणारी घटना घडली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .

               समीर हरिदास पराडे यांचे १३ में रोजी घोटी (ता .माढा ) येथील जानकी बाळासाहेब गळगुंडे यांच्याशी मोठया दिमाखात विवाह सोहळा निरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात संपन्न झाला होता.लग्नानंतर नववधू सासरी आली दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक छातीत कळा येऊ लागल्याने .

 तात्काळ अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे घेऊन जात असतानाच प्रवासा दरम्यान नववधू वर काळाने झडप घातली .सासरच्या सुनेचा व माहेरच्या लेकीचा अचानक झालेल्या मृत्युने दोन्ही कुटुंबाने टाहो फोडला होता. मृत्यू झालेल्या कै. जानकी हिच्यावर बाभुळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा