Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

*वाशी येथील कर्मवीर जगदाळे मामा महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती सप्ताह निमित्त परिसर स्वच्छता*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये परिसर स्वच्छता करण्यात आली. यामध्ये कनिष्ठ वरिष्ठ व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (किमान कौशल्य) विभागाकडील विद्यार्थी विद्यार्थींनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी,राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. 



यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.शाम डोके यांनी महात्मा गांधी यांचे विचार तसेच आपल्या जीवनातील स्वच्छतेचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. आपले घर जसे आपण स्वच्छ ठेवतो तसेच परिसर सफाई हेही आपले कर्तव्य आहे , याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. फक्त वैयक्तिक स्वच्छता किंवा घरातील स्वच्छता महत्त्वाची नसून जेंव्हा पूर्ण वस्ती शहर स्वच्छ होईल त्याच वेळस निरोगी पिढी तयार होईल. आज जे साथीचे आजार आपण पाहतो ते बऱ्याच वेळेस या अस्वच्छतेमुळेच होतात.असे ते म्हणाले. 

यानंतर विद्यार्थांना अल्पोउपहार देण्यात आला.श्रमदानाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.शाम डोके,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.अनंत पाटील, डॉ.आनंद करडे, प्रा.डॉ सुचित्रा जाधव व सर्व विभागाकडील प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले.


 *बळीराम जगताप*

  *वाशी -धाराशिव*

  मो--9421 352 738

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा