*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
संविधानाबाबत जनतेत जागृती होऊन नागरिकांना संविधानाने दिलेले मूलभूत अधिकाराची जाण व्हावी या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्वच तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभाची निर्मिती होणे काळाची गरज आहे संविधान स्तंभ सोलापूर, बारामती, इंदापूर ,दौंड ,लातूर ,बीड अशा अनेक ठिकाणी बसविलेला आहे अशा संविधान स्तंभाची अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे उभारणी व्हावी या हेतूने मी स्वतः पुणे पदवीधर संघाचे विद्यमान विधान परिषद सदस्य माननीय अरुण अण्णा लाड यांची व्यक्तिश भेट घेऊन निधीची मागणी केली या मागणीची त्वरित दखल आमदार अरुण लाड यांनी घेऊन आपल्या आमदार निधीतून संभाव्य संविधान स्तंभास 7 लाख रुपये देण्यात जाहीर करून असे पत्र सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या नावे दिले
यावर सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांनी मंजुरीसाठी मंत्रालयात हे पत्र पाठवून तसे कळवले असता मंत्रालयातील अव्वर सचिव नियोजन विभाग यांनी महाराष्ट्र शासनाच्या पुतळे ,स्मारक, स्वागत कमानी यांच्या निर्मितीस मंजुरी देता येत नसल्याचे परिपत्रक द्वारे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे अकलूज मध्ये संभाव्य संविधान स्तंभ उभारण्याचे कार्य रहित झाले.
मुळातच संविधान स्तंभ हा देश गौरवाचा विषय आहे संविधानावरच केंद्र सरकार, विविध राज्य, सरकारी न्यायालय सह अनेक संस्था व आयोग यांचे कामकाज चालते त्यात संविधान स्तंभास महाराष्ट्र शासन विरोध करीत आहे हे अनाकलिय आहे
विविध महामानवांचे पुतळे ही त्या त्या जातीची अस्मिता असते व झालेली आहे मात्र त्यात जातीय चष्म्यातून संविधान स्तंभाकडे पाहिले जाते हे या देशाचे दुर्दैव आहे
महाराष्ट्रातील सत्ताधारी राज्यकर्ते संविधान स्तंभाकडे जातीयवादी दृष्टीत नजरेने पाहतात ही खूप दुःखदायी बाब आहे सबब संविधान स्तंभास या ना त्या कारणाने विरोध करणारे मा नामदार एकनाथजी शिंदे, मा देवेंद्रजी फडणवीस ,माननीय ना अजित दादा पवार या मनू मानसिकतेच्या त्रिमूर्तीचा मी तीव्र निषेध व्यक्त करीत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा