Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

*अकलूज येथील खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते संघटक सचिव --"विकास बापू लवांडे" यांच्या आवाहनाने उपोषणाची सांगता*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

अकलूज शहरामध्ये संविधान स्तंभ हा उभारला जावा म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहित गायकवाड यांनी पुणे पदवीधर मतदार संघातील विद्यमान विधान परिषद सदस्य आमदार अरुण (आण्णा) लाड यांची भेट घेऊन त्यांना संविधान स्तंभा विषयीचे निवेदन दिले असता आमदार अरुण (आण्णा) लाड या मागणीची त्वरीत दखल घेत या कामास सात लाख रुपये देण्याचे जाहीर केले तसे पत्र जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या नावे होते.

          जिल्हाधिकारी सोलापूर यांनी पुढील मंजुरीसाठी मंत्रालयात हे पत्र पाठवून कळवले.मात्र मंत्रालयातील नियोजन विभागाच्या अव्वर सचिवांनी महाराष्ट्रात पुतळे, स्मारक,स्वागत कमानी वगैरे साठी शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार अशा कामास मंजुरी देता येत नसल्याचे कळाविले.त्यामुळे नियोजीत संविधान स्तंभाची उभारणी करता येणे शक्य नसल्याच्या निषेधार्थ मोहित गायकवाड प्रदेश सरचिटणीस,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार यांनी अकलूजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्या लगत दि.२७ पासून आमरण उपोषण सुरु केले.या दरम्यान मोहित गायकवाड यांची प्रकृती बरीच खालावली.ही बाब विकास बापू लवांडे यांनी खा.सुप्रियाताई सुळे यांना सांगितली असता त्यांनी उपोषणकर्ते मोहित गायकवाड यांना फोन करून हे सरकार जातीयवादी व संविधान द्रोही असल्याने या उपोषणाची महाराष्ट शासन व ते चालवणारे राज्यकर्ते हे कितपत घेतील ही एक शंकाच आहे.येणारे सरकार हे मविआचेच असेल तेंव्हा तुमच्या मागणीची त्वरीत दखल घेतली जाईल. म्हणून आपण हे उपोषण येथेच स्थगित करावे अशी सुचना सुप्रिया ताई व विकास बापू लवांडे यांनी आवाहन केले.त्यानुसार आज रविवारी मोहित गायकवाड यांनी अकलूज पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक निंभोरे साहेब यांच्या हस्ते लिंबू सरबत प्राशन करून उपोषणाची सांगता केली.

              यावेळी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत प्रकाश काले,युवा कार्यकर्ते आदर्श गायकवाड,युवराज गायकवाड,विकास दळवी,जय खरे,अजय कांबळे,अभिषेक गायकवाड,सोमनाथ परदेशी हे उपस्थित होते.अकलूज पोलीस स्टेशनचे शिवकुमार मदभावी, बकाल यांनी या वेळी वेळोवेळी सुचना व सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा