Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी जनतेचा निर्णय मान्य - हर्षवर्धन पाटील --- हर्षवर्धन पाटील यांची गणेशवाडी येथे घोड्यावरून मिरवणूक!


 

इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

----- इंदापूर तालुक्याची गेल्या 10 वर्षांमध्ये सर्वच क्षेत्रात पीछेहाट झाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्या विधानसभा उमेदवारी संदर्भात जनता सांगेल तो निर्णय पितृपंधरवडा संपल्यानंतर घेतला जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गणेशवाडी-बावडा येथे केले.

         बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नागरी सुविधा, जन सुविधा, दलितवस्ती सुधारणा व इतर योजनेतून ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित रु. २ कोटी ७६ लाखांची विविध उद्घाटने व भूमिपूजनांचे कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी अनेक उद्घाटने व भूमिपूजने हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत मोटार सायकलवरून प्रवास करीत केली. त्यानंतर गणेशवाडी-बावडा येथे आयोजित जाहीर सभेत हर्षवर्धन पाटील बोलत होते.

    ते पुढे म्हणाले, राज्यामध्ये इंदापूर तालुक्याच्या पूर्वीचा असलेला दबदबा, नैतिक वजन निर्माण करावयाचे आहे. इंदापूर तालुका हे आपले कुटुंब आहे, तालुक्याचा स्वाभिमान, संस्कृती व सुसंस्कृतपणा जपावयाचा आहे. आगामी विधानसभेसाठी जो निर्णय होईल तो इंदापूर तालुक्याच्या विकासासाठीच असेल.

        माझ्या विधानसभा उमेदवारी संदर्भात निर्णय तालुक्यातील जनता घेईल, जनता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. आपल्या विजयाची घोडदौड कोणी रोखू शकणार नाही असे हर्षवर्धन यांनी भाषणामध्ये उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.



     इंदापूर तालुक्यात गेल्या दहा वर्षात नवीन संस्था उभी राहिली नाही, एक इंचही नवीन क्षेत्र सिंचनाखाली आलेले नाही, नवीन उद्योग आले नाहीत, शिक्षण क्षेत्र, बेरोजगारी या संदर्भात कामे झालेली नाहीत. तालुक्याच्या विकासाचे नियोजन झाले नाही, आगामी काळात विकासाची गंगा इंदापूर तालुक्यात आणायची आहे. बावडा गावासाठी वाढीव नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, खंडोबानगर सुमारे 12 ते 15 कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचा पाणी साठवण टॅंक उभारण्यात येणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सांगितले.

    यावेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य अशोकराव घोगरे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सभेपूर्वी हर्षवर्धन पाटील यांची वाजत-गाजत  घोड्यावरून मोठी मिरवणूक करण्यात आली.

प्रास्ताविक तुकाराम घोगरे यांनी केले. या सभेस मयूरसिंह पाटील, मनोज पाटील, सरपंच पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजित घोगरे, कमाल जमादार, किरण पाटील, विकास पाटील, प्रसाद पाटील, अमरदीप काळकुटे,  विठ्ठल घोगरे, ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन अमर निलाखे तर आभार सयाजीराव घोगरे यांनी मानले. कार्यक्रमास कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

फोटो:- गणेशवाडी-बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते विविध कामांची उद्घाटने-भूमिपूजने संपन्न झाली.

-----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा