Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

*"शेलक्या बारा" राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित*


 

*उपसंपादक --नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

लेखक इंद्रजीत पाटील लिखित ' शेलक्या बारा ' या कथासंग्रहाला स्व.बाबासाहेब के.नारखेडे स्मृति राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,भुसावळ,जि.जळगाव या शैक्षणिक संस्थेने तज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक परीक्षकांकरवी राज्यातून एकमेव या कथासंग्रहाची सदर पुरस्कारासाठी निवड केली. अल्पावधीतच या कथासंग्रहाला हा चाैथा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असून प्रस्तुत समारंभाचे व संस्थेचे अध्यक्ष मा.डाॅ.श्री.मकरंद एन. नारखेडे,प्रमुख पाहुणे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,पुणेचे विज्ञान विभागप्रमुख मा.डाॅ.श्री.दिलीप देशमुख सर,स्पर्धाप्रमुख श्रीमती एन.के.बाविस्कर,श्री.डी.एम.हेलाेडे व कै.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.एन.बी.किरंगे सर व सदर संस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित हा पुरस्कार लेखक इंद्रजीत पाटील व साै.मनिषा कुतवळ - नाईकनवरे यांनी सन्मानपूर्वक स्वीकारला.हा पुरस्कार प्रभाकर हाॅल,प्रांत कार्यालयासमोर,भुसावळ याठिकाणी दि.२१सप्टेंबर २०२४,वार - शनिवार राेजी दुपारी २.३० वा.त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला.

        ग्रामीण भागातील या लेखकाने आपल्या दर्जेदार लिखाणाच्या जाेरावर अगदी पारदर्शक व मानाचे असे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळवल्यामुळे त्यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.त्यांची भावी वाटचाल आणखी यशस्वी होण्यासाठी श्री.पंडितराव लाेहाेकरे, चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा