*सहसंपादक-- डॉ.संदेश शहा (इंदापूर)*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो :-9922419159*
इंदापूर नगरपरिषदेच्या झालेल्या अटीतटीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांनी कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार प्रदीप गारटकर यांचा पराभव करत नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्विवाद झेंडा फडकवला. या निवडणुकीत ते जॉईंट किलर ठरले. निवडणूकीच्या दिनांक २१ डिसेंबर रोजी शासकीय गोदामात झालेल्या मतमोजणीनंतर इंदापूरच्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांच्यासह १४ नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करत नगरपरिषद इतिहासात पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडे निर्भेळपणे इंदापूर नगरपरिषदेची सत्ता सोपवली आहे. त्यामुळे नवीन विकासपर्वास प्रारंभ होत आहे.
----: जाहिरात:-++
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरण तयार होऊन भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट, रासप व इतर लहानमोठ्या पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध कृष्णा भीमा विकास आघाडी तयार करण्यात आली होती. या आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांना १२७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पक्षाविरुद्ध बंड करून ही निवडणूक लढवली होती. त्यांना सहा नगरसेवक पदाच्या जागांवर समाधान मानावे लागले. काही ठिकाणी नोटास पडलेल्या मतांमुळे त्यांच्या आघाडीचा पराभव सुकर झाला आहे
येथील शासकीय गोदामात सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर मागाडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. यावेळी तीन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दहा वाजण्याच्या सुमारास प्रथम टपाली मतदान मोजले गेले. पहिल्या पाऊण तासानंतर पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला. पहिल्या फेरीत प्रदीप गारटकर यांना ३ हजार ६४१ तर भरत शहा यांना ३ हजार ५२२ मते मिळाली. या फेरीत श्री. गारटकर यांनी ११९ मतांची आघाडी घेतली. त्यामुळे कृष्णा भीमा आघाडीत जल्लोष होता. मात्र दुसऱ्या फेरीत भरत शहा यांनी पिछाडी भरून काढत १५७ मतांची आघाडी घेतली. त्यांना ३ हजार ८१९ तर प्रदीप गारटकर यांना ३ हजार ५४३ मते मिळाली. तिसऱ्या फेरी अखेर भरत शहा यांना ९ हजार ८२५ मते मिळाली तर प्रदीप गारटकर यांना ९ हजार ६९८ मते मिळाली. त्यामुळे श्री. शहा विजयी होऊन श्री.
गारटकर यांना १२७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत क्षणाक्षणास उत्कंठा वाढत होती.
निकालानंतर गुलालाची उधळण करत भरत शहा यांना उचलून घेत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा तसेच भरत शहा यांची सुविद्य पत्नी सौ. वैशाली शहा यांनी भरत आला परत अशी जोरदार घोषणाबाजी केली. विजयश्री संपादन केलेल्या भरत शहा व त्यांच्या सहकारी नगरसेवकांची कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत संपूर्ण शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील शिवाजी चौकात
खडकपुऱ्यावर मतदारांचे आभार मानण्यासाठी यावेळी अनौपचारिक सभा संपन्न झाली.
निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : प्रभाग क्र. १ अ )- उमेश रमेश मखरे ( ७६८ ), प्रभाग क्र. १ ब )- सुनिता अरविंद वाघ ( ९२३ ), प्रभाग क्र. २ अ ) सुनिता अमर नलवडे ( ७९६ ), प्रभाग क्र. ३ अ ) वंदना भारत शिंदे (८४६), प्रभाग क्र. ४ ब) शकील मकबूल सय्यद (९४५), प्रभाग क्र.५ अ ) दिप्ती स्वप्नील राऊत (९०८),५ ब) अक्षय शंकर सूर्यवंशी. ( ८३५ ), प्रभाग क्र.६ अ ) शुभम पोपट पवार (१२१५), प्रभाग क्र. ७ ब ) सौ. मयुरी प्रशांत उंबरे (१९७६), प्रभाग क्र. ८ अ ) सागर सुनिल अरगडे (१२८४), प्रभाग क्र. ८ ब) रजिया हजरत शेख ( ९४४ ), प्रभाग क्र. ९ अ) शोभा सुरेश जावीर (१३६७), प्रभाग क्र.९ ब )- शैलेश उर्फ बाळासाहेब देविदास पवार (१६४५), प्रभाग क्र. १० अ ) अनिता अनिल ढावरे (११७८).( एकूण१४ )●
● कृष्णा भिमा विकास आघाडी प्रभाग क्र. २ ब ) अनिल सुदाम पवार (९१६), प्रभाग क्र. ३ ब ) गणेश नंदकुमार राऊत ( ७६८ ), प्रभाग क्र. ४ अ) शकीला खाजा बागवान (११९९ ), प्रभाग क्र. ६ ब) शीतल अतुल शेटे (१४९९), प्रभाग क्र.७ अ) सदफ वसीम बागवान (१०१०), १० ब) सुधाकर संभाजी ढगे ( ९७२ ) ( एकूण ६)
नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर भरत शहा म्हणाले, येत्या पाच वर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे मार्गदर्शन व सहकार्याने, निवडणूक प्रचारकाळात इंदापूरकरांना दिलेली व जाहिरनाम्यात नमूद केलेली वचने पूर्ण करुन इंदापूर शहराचा चौफेर विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.
● निवडणूक अटीतटीची झाल्यामुळे झालेला काठावरचा पराभव आम्ही मान्य करत आहोत. पुढच्या काळात नव्या जोमाने काम करु असे प्रतिपादन कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांनी केले.
● या निवडणुकीत शकीलभाई सय्यद, आपले मेंबर ग्रुपचे अध्यक्ष अनिल पवार, उमेश मखरे, शुभम पवार, दीप्ती राऊत यांच्यासारख्या आक्रमक सामाजिक कार्यकर्त्यांचा विजय झाला तर माजी उपनगराध्यक्ष प्रा.कृष्णा ताटे यांच्या सारख्या दिग्गज ज्येष्ठ अनुभवी उमेदवार तसेच रचनात्मक कार्य करणाऱ्या व प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या संदीपान कडवळे यांना पराभव पत्करावा लागला आहे.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा