*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आता तरी प्रशासनाला जाग येणार का ? का शासन जनता पाण्यासाठी तडपडून मरताना बघायची वाट बघत तर नाही ना ? असा संतप्त सवाल भांबुर्डी (ता.माळशिरस) येथील ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.७५ वर्षाच्या आजोबाने ग्रामपंचायतला स्वत:च्या मालकीची चार गुंठे जागा बक्षीस पत्र करून विनामूल्य दिली आहे.
---: जाहिरात:---
माळशिरस तालुक्यातील भांबर्डे या गावात जल जीवन मिशन (जी जी एम) ही भारत सरकारची २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे सुरक्षित पाणी पुरवण्याची योजना होती.ही योजना जलशक्ती मंत्रालयाद्वारे चालवली जाते.यात जल संवर्धन पुनर्वापन आणि ग्रामपंचायतच्या सहभागावर भर दिला जातो.यामुळे ग्रामीण भागाचे पाणीपुरवठा व्यवस्थापन सुधारते.ही योजना राबवण्यासाठी ग्रामपंचायतला सुरेश विठ्ठल बर्गे (वय ७५) यांनी स्वतःच्या मालकीची चार गुंठे जागा बक्षीस पत्र करून दिलेली आहे.स्वतःला दम्याचा त्रास असताना सुद्धा कुठलाही पुढचा विचार न करता मोकळ्या मनाने गावासाठी जागा दिली.गावातील लोकांनी पाणी पिऊन तृप्त व्हावे हे त्यांचे स्वप्न होते.परंतु गावातील काही ना कर्ते व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावानं पाणी पिण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने वयाच्या ७५ व्या वर्षी स्वतःला दम्याचा त्रास असताना सुद्धा ग्रामस्थांच्या मदतीने भांबुर्डी या ग्रामपंचायतीला टाळा ठोकला आहे.
*चौकट---*
जोपर्यंत गावाला पाणी मिळत नाही तोपर्यंत कुलूप काढणार नाही.मला अटक केली तरी चालेल.गावासाठी मरायला तयार आहे.
सुरेश बर्गे भांबुर्डी.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा