*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
एकीकडे गेली अनेक वर्षात अनेक सरकार व अनेक पक्ष सत्तेत बसले तर उजनी धरण उशाला आहे असे असताना सीना माढा उपसा सिंचन चे पाणी अद्यापही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले नाही ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा लावली असून सीना माढा उपसा सिंचनचे पाणी जोपर्यंत शेवटच्या गावाला पोहोचत नाही तोपर्यंत शांत राहणार नसल्याचा इशारा देत प्रसंगी रक्ताचा सडा सांडू मात्र आमच्या हक्काचे पाणी मिळवूच असे प्रतिपादन जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी केले.
शेतकरी संघटना बळकट करण्यासाठी अतुल खूपसे पाटील यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी दिल्या. पुढे बोलताना म्हणाले की सीना माढा उपसा सिंचन मध्ये ४० गावांचा समावेश आहे. यासाठी ४. ७५ टीएमसी पाणी मंजूर आहे. मात्र या ४० गावांपैकी जाधव वाडी, बैरागवाडी, मोडनिंब, तुळशी, विठ्ठलवाडी, लोंढेवाडी, वडाचीवाडी, गोरेवाडी या गावांना अद्यापही पाणी मिळाले नाही. इथल्या हजारो शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत सिनेमा उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या शेवटच्या गावापर्यंत आणि गावातील बांधापर्यंत पाणी पोहोचत नाही तोपर्यंत शांत राहणार नसल्याचे सांगून प्रसंगी रक्त सांडण्याची जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांची तयारी असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला.
यावेळी औदुंबर सावंत, महादेव सावंत, मोहन सावंत, निसार काझी, बापू सावंत, हरीश गिड्डे, प्रकाश सावंत, लखन लाड, नितीन जाधव, शंकर सावंत, संदीप राऊत, बालाजी सावंत, गणेश ओहोळ, रोहिदास अवचर, ज्ञानेश्वर आवचर, मनोहर गुजले, चतुर्भुज सावंत, भाऊसाहेब लोहार, राजकिरण ओहोळ, औदुंबर सावंत, हनुमंत लाड, संतोष लोहार, प्रेम लोहार यांच्यासह जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट १
सीना-माढा उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊन अनेक वर्ष झालं. मात्र ओव्हरफ्लो किंवा पावसाळ्यात आम्हाला पाणी सोडण्यात येते. मात्र उन्हाळ्यात जे पाळीचे पाणी असते ते पाणी अद्याप आम्हाला मिळाले नाही. यासाठी जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून अतुल भाऊंनी लढा उभारला तर आम्ही सर्व शेतकरी सोबत राहू.
सौदागर जाधव,
वरिष्ठ जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी,
जाधववाडी ता.माढा






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा