Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ जून, २०२६

*तुळजापूर नगर परिषद दीपक चौकात बसवत असेलैल्या गेट ला स्थानिक रहिवाशांचा विरोध---- त्या संदर्भात मुख्याधिकारी यांना दिलेले निवेदन*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


 दिपक चौक येथे गेट बसवत असल्याने. दीपक चौक ,जवाहर गल्ली ,गवळी गल्ली ,आर्य चौकातील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असून त्याबाबत तुळजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्थानिक रहिवाशांनी  निवेदन दिले आहे 

   याबाबत स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे  विनंती केले आहे की दिपक चौक भवानी रोड येथे गेट वसविण्याची तयारी प्रशासन करत आहे असे आम्हाला काल निदर्शनास आले तरी हे गेट लावल्यास परिसरातील शेकडो नागरिकांची दैनंदिन ये जा सुरू असते परंतु प्रशासन जर हा निर्णय घेत असेल तर स्थानिक रहिवाशांना, महिलाना, वृध्द व शाळकरी मुलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागेल तसेच परिसरात कोणतीही वैदयकीय आणिवाणी उदभवल्यास रूग्णवाहिका किंवा दुर्गघटना घडल्यास अग्नीशामक दलास गाड्या आत येण्यासाठी अडचण होणार आहे. व या अनपेक्षित घटनेमुळे कोणतीही जिवीतहानी झाल्यास त्याची जवाबदारी कोणाची तसेच आम्हा स्थानिक रहिवाशांची उपजिवीका येण्या-या भाविकांवर व इतर लहान व्यवसायावर अवलंबुन आहे तसेच हा रस्ता अडवल्यास गाहकांना दुकानापर्यत पोहचणे शक्य होणार नाही यामुळे व्यवसायाकांचे आर्थिक उत्पन्न पुर्णपणे ठप्प होईल व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल तरी प्रशासन जर हा निर्णय घेत असेल तर तो रदद करावा अन्यथा आम्हास तीव्र अंदोलन व उपोषण करावे लागेल असा इशारा नगरपरिषद प्रशासनास स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा