Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

*पिक विमा स्थानिक नैसर्गिक आपत्ती इत्यादीची पूर्व सूचना द्या!*


 

*विशेष ----प्रतिनिधी*

  *एहसान  मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो--9096 837 451*

खरीप हंगाम  2024 -2025 मध्ये तालुका कृषी अधिकारी अधिनस्त 116 गावांमधील अधिघोषित क्षेत्रातील अधिघोषित पिकासाठी ज्या शेतकरी बांधवांनी एक रुपया विमा भरून सर्व समावेशक विमा मध्ये भाग घेतला आहे .पिक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांचे अतिवृष्टी ' पूर सततचा पाऊस ,स्थानिक अप्पती ,जलप्रलय , आग इत्यादीमुळे जर बाजरी मका कांदा तूर या पिकाचे नुकसान झाले असेल तर शेतकरी बांधवांनी तत्काळ पिक विमा टोल फ्री क्रमांक 14 44 7,तालुका कृषी अधिकारी कार्यालय,मंडल कृषी अधिकारी कार्यालय,पिक विमा कंपनी प्रतिनिधी व क्रॉप इन्शुरन्स हे ॲप गुगल स्टोअर किंवा प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून पीक नुकसानीची पूर्व सूचना देणे कर्मप्राप्त आहे .पीक नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत किंवा तीन दिवसाच्या आत ही पुर्व सूचना देणे गरजेचे आहे .पूर्वसूचना उशिरा दिल्यास सदरची पूर्वसूचना ग्राह्य धरली जात नाही याची शेतकरी बांधवांनी कटाक्षाने नोंद घ्यावी .यावर्षीपासून पिकाच्या कोणत्याही वाढीच्या अवस्थामध्ये पूर्व सूचना दिल्यास नुकसान भरपाई ही पीक कोणत्या वाढीच्या अवस्थेत आहे हा विचार न करता पिकाचे नुकसान किती टक्के झाले यानुसार भरपाई मिळणार आहे . यावर्षी पिक विमा साठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ची नेमणूक आहे .याद्वारे शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की ज्या शेतकरी बांधवांनी पिक विमा भरला आहे त्यांनी अशी नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे जर पिकाचे नुकसान झाले असेल तर वर नमूद केलेल्या विभाग, कंपनी कार्यालय , जबाबदार व्यक्ती यांना पुर्व सूचना देण्याचे अहवान तालुका कृषी अधिकारी माळशिरस कार्यालय, अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे .अधिकच्या माहितीसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी तालुका प्रतिनिधी श्री पळसे यांचे मोबाईल नंबर70 836 97 172 यावर संपर्क करावा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा