*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451
या वर्षी माझी वसुंधरा अभियान मध्ये अकलूज नगरपरिषद नवनिर्मित असून देखील उत्तम कामगिरी करून पुणे विभागात २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून ७५ लाखाचे बक्षीस मिळवले आहे.
माझी वसुंधरा ४.० मध्ये अकलूज नगरपरिषदेने अकलूज शहरात विविध ठिकाणी वृक्षलागवडीचे कार्यक्रम हाती घेऊन शहरात वृक्षारोपण केले. त्याचबरोबर स्वच्छतेचे विविध कार्यक्रम , शहरात महाराष्ट्र वृक्ष संवर्धन कायदा अंतर्गत वृक्षतोडीेस बंदी करणे, वृक्ष गणना , रोपवाटिका निर्मिती, ३३% हरित आच्छादन, जैवविविधता नोंदवही, प्लास्टिक पिशवी बंदी, शौचालयाची उपलब्धता, शहरात चार्जिंग स्टेशन, इलेक्ट्रिक वाहनांना चालना देणे, नगरपरिषद मालकीचे सर्व व्यापारी संकुल यांना रेनवॉटर हार्वेस्टिंग करून शोषखड्डे तयार करणे, विहीर पुनर्भरण, जल परीक्षण, नूतनीकरण ऊर्जा स्त्रोत अंतर्गत शहरात सोलर बसवणे, एलइडी पथदिवे बसवणे, वसुंधरा शपथ ,विविध प्रभातफेरी व स्पर्धांचे आयोजन करणे, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणे , घनकचरा या सारखे विविध उपक्रम हाती घेऊन काम पूर्ण केले.
माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये अकलूज नगरपरिषदेस २५ ते ५० हजार लोकसंख्या गटात पुणे विभाग स्तरावर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळाला असुन ७५ लक्ष रुपयाचे बक्षीस मिळाले आहे. लवकरच बक्षीस वितरण होणार असून बक्षीस वितरण मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते अकलूज नगरपरिषदेस देण्यात येणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा