*संपादक ---हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;-9730 867 448*
मराठा आंदोलक मनोज (दादा) जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी राज्य शासनास यथायोग्य निर्देश द्यावे अशी मागणी धाराशिव लोकसभेचे लोकप्रिय खासदार" ओमप्रकाश राजे निंबाळकर "यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना निवादनाद्वारे मागणी केली आसुन विस्तृत मागणी पुढील प्रमाणे
मराठा आरक्षण आंदोलक मनोज (दादा) जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण व तद्अनुषंगिक मागण्यांची पुर्तता होण्यासाठी मौजे अंतरवली सराटी ता. अंबड जि. जालना येथे दिनांक 17/09/2024 पासुन आमरण उपोषणास बसलेले आहेत. मनोज (दादा) जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे
मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीची दखल घेऊन सदरील उपोषण तातडीने सोडवण्यासाठी राज्य शासनास आवश्यक ते आदेश द्यावेत.आशीही विनंती निवेदनात केली आहे
(ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन रजिनिंबाळकर)
ऑफिस : पवनराजे कॉम्प्लेक्स, राजीव गांधीनगर, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव ४१३ ५०१





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा