Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४

*राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमुळे कौशल्य व कलागुणांचा विकास--- प्रा. डॉ. आबासाहेब देशमुख*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

पाचोड - येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उच्च शिक्षणातील नवीन *राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020)** या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी भूषविले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये ज्ञानाबरोबरच कार्यानुभव ,नेतृत्व विकास, प्रॅक्टिकल्स ,प्रोजेक्ट वर्क्स ,ऑन-द-जॉब ट्रेनिंग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, मूल्यशिक्षण इत्यादी बाबीवर भर देण्यात आला असल्यामुळे याचा फायदा विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी होणार आहे. तसेच त्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याची मुभा देण्यात आली असल्याने नवनवीन कौशल्य आत्मसात करता येणार आहेत.त्यामुळे विद्यार्थी परिपूर्ण होण्यास मदत होईल . अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन नेतृत्व गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित होईल. नवीन धोरणातील मल्टिपल एक्झिट व मल्टिपल एन्ट्री तसेच संपूर्ण राज्यभर समान शैक्षणिक आराखडा व श्रेयांक आराखडा करण्यात आल्यामुळे पालकांची राज्यात कुठेही बदली झाली तर त्यांच्या मुलांना कोणत्याही वर्गात शिकत असताना विद्यापीठ बदलता येणार आहे तसेच इंटरडिसिप्लिनरी विषय निवडण्याची ही मुभा दिली आहे नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत लवचिक करण्यात आले आहे या मुळे शैक्षणिक गळती कमी करण्यास मदत होईल.  

यावेळी अंबड न्यायालयामध्ये क्लार्क म्हणून निवड झाल्याबद्दल वैजनाथ जाधव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप सातोणकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ.तुकाराम गावंडे यांनी केले तर आभार डॉ. हेमंत कुमार जैन यांनी मानले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण काळे उपस्थित होते. मुख्याध्यापक बजरंग काळे, ,उपप्राचार्य शिवाजी यादव ,डॉ.सुभाष पोटभरे, डॉ. सुरेश नलावडे ,प्रा. अरुणा दसपुते, डॉ. विलास महाजन, डॉ. गांधी बानायत, डॉ. उत्तम जाधव, डॉ. भगवान जायभाय, डॉ. हरिप्रसाद बिडवे, प्रा. विनोद कांबळे, प्रा. सचिन कदम अनिल नरवडे ,मुरलीधर जिने, वैभव राऊत, ज्ञानेश्वर बेटुळे आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा