*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
महाराष्ट्राचे संघर्ष योध्दा" मनोज जरांगे पाटील " यांच्या सलग ९ दिवसाच्या आमरण उपोषणा नंतर त्यांची प्रकृती अतिशय खालावली आहे त्यांना संभाजीनगर येथील हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहे त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांची तब्येत ठणठणीत व्हावी यासाठी बार्शी तहसील कार्यालयासमोर गरजवंत मराठा समाजाच्या वतीने होम हवन यज्ञ करून प्रार्थना व्यक्त करण्यात आली जरांगे पाटलांची महाराष्ट्रातील सर्व गरजवंत समाजाला गरज असल्यामुळे त्यांच्यासारखा योद्धा आजारी असणे घायाळ असणे योग्य नाही ते लवकरात लवकर बरे होऊन या महाराष्ट्राच्या मैदानामध्ये उतरून मैदानी गाजवतील असा विश्वास देखील यावेळी बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला हा होम तहसील कार्यालय समोर करत असताना ज्या सरकारने मराठा समाजाचा आणि जरांगे पाटलांचृ रक्त पिलेले आहेत त्या सरकारला येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये मराठा समाज धडा शिकवल्या शिवाय शांत बसणार नाही मराठा समाज जर कर्नाटक सरकार दिल्ली सरकार किंवा काश्मीर सरकार नव्हे तर पाकिस्तान सरकारला जरी आरक्षण मागत असला असता तर पाकिस्तान सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं असतं परंतु हे सरकार देत नाही त्यामुळे या सरकारला येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या सर्व गोष्टी बरोबरच मराठा समाजाला सर्वात महत्त्वाचा असणारा म्हणजे "संघर्ष योध्दा- मनोज जरांगे पाटील" यांचे प्रकृती ठिक होणे ते तंदुरुस्त होणे हे महत्त्वाचं असल्यामुळे आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर हा होम करत आहोत यातून लवकरच जरांगे पाटलांची प्रकृती सुधारेल असा विश्वास बार्शी तालुक्यातील तमा मराठा बांधवांना आहे असा विश्वास आनंद काशीद यांनी व्यक्त केला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती -लक्ष्मण संकपाळ, विनायक मामा घोडके, विक्रम बापू घाईतडक ,भीमराव गंडोरे ,पांडुरंग घोलप, रणजीत पाटील , हनुमंत जाधव, यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा