*प्रतिनिधी -चंद्रशेखर केंगार*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
्
औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या अथक प्रयत्नातून कासार शिरसी येथे साकारण्यात आलेल्या तीन कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा दूर दृश्य
प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कासार शिरसी येथे सादरीकरण करण्यात आलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार पत्नी सौ शोभाताई पवार या होत्या या निमित्य स्थानक परिसरात करण्यात येणाऱ्या तीन लाख रुपये खर्चाच्या सिमेंट करणाचा शुभारंभ ही करण्यात आला या निमित्य अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला
विकासासाठी कासार शिरसीसह परिसराचा पॅटर्न आमदार पवार यांनी साध्य केल्याने या भागाचा तारणहार भाग्योदय करणारे आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर यावेळी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला याप्रसंगी येथील बसस्थानकात हा सोहळा पाहण्यासाठी अनेक प्रवाशांसह मोठ्या जनसमुदाय जमला होता
सौ शोभाताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभास परिवहन महामंडळाचे सर्वस्वी पडळकर साहेब बिडवे साहेब भोसले साहेब यांच्यासह कविता बडूरे कल्पना गायकवाड कविताताई गोरे ज्योती कलशेट्टी उषा नेलवाडे यांचे सह ज्ञानेश्वर वाकडे जिलानी बागवान धनराज होळकुंदे वीरेश चिंचूनसुरे ओम बिराजदार नाना धुमाळ आदी मान्यवर हजर होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा