*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन होम यज्ञ मंडपात शिवज्योत पेटवून मुंबई शिवतीर्थ येथे होत असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पारंपरिक दसरा मेळाव्यात धगधगती परिवर्तनाची मशाल घेऊन जात आहोत,यावेळी राज्यातील गद्दार सरकार जाऊन लवकरच महाराष्ट्रात सुशासन येऊ दे तुळजाभवानी चरणी साकडे घालत आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी प्रार्थना केली.
आई तुळजाभवानी मातेने ज्याप्रमाणे महिषासुर असुराचा वध केला होता तशाच पध्दतीने या राज्यातील कुशासन जाऊन महाविकास आघाडीला यश देईल,यासाठी परिवर्तनाची मशाल पेटवून सर्व सामान्यांचे सरकार आणण्यासाठी शिवाजी पार्क शिवतीर्थावर प्रतिवर्षीची प्रथेनुसार तुळजाई नगरीतून ज्योत घेऊन जात आहोत अशी प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.
याप्रसंगी आमदार कैलास पाटील यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख शाम पवार,प्रतिक रोचकरी विकास भोसले, अर्जुन साळुंके, विकी वाघमारे, नितीन जट्टे, आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा