*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर विधानसभा निवडणूक लढविण्याची व मुस्लिम समाजाच्या बद्द्ल वादग्रस्त वक्तव्य करण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानात महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन १०/१०/२०२४ सुरू केले होते.सदर मागणीचे निवेदन राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते.आंदोलनवेळी प्रदेश सचिव अनिल साठे,राज्य सरचिटणीस अविराज माने,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,नाभिक समाजाचे नेते किरण भांगे,महूद ग्रामपंचायत सदस्य धनाजी कांबळे,किरण खंडागळे,युवा सेना जिल्हा संघटक,अजय माने,दया कांबळे,चेतन साठे,गिरीराज अडगळे,रोहन साठे,रफिक मुलाणी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या कार्यालयाचे अवर सचिव विनायक गवाणकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाचे अवर सचिव यांना पत्रव्यवहार करून महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या अर्जावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.किरण साठे यांनी दिलेल्या निवेदनावर राज्यपाल यांच्या कार्यालयातून पत्रव्यवहार झाल्याने आंदोलनाची राज्यपाल यांनी दखल घेतली असल्याचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा