Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०२४

*लखनऊ-- पुणे इंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा!... समाज माध्यमावर धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल!....*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

पुणे : इंडिगोच्या तीन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे एका माथेफिरूने समाज माध्यमावर टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली. विमानाची तपासणी केल्यानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिस प्रशासन, सीआयएसएफ, विमानतळ प्रशासन आणि संबंधित विमान कंपनीने सुटकेचा श्वास सोडला.


बुधवारी मध्यरात्री लखनऊ येथून पुण्याला येत असलेल्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी पोलीस नियंत्रण कक्षाला आला. एका माथेफिरूने समाज माध्यमावर 'मी विमानात बॉम्ब ठेवला असून, आज खूप लोक संपणार आहेत' असे लिहिले होते. विमान पुणे विमानतळावर उतरण्याचा दहा मिनिटे आधी, मध्यरात्री बाराच्या सुमारास पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर संबंधित विमान आयसोलेशन बे मध्ये लँड करण्यात आले. रेस्क्यू टीमने प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.


बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (बीडीडीएस) संपूर्ण विमानाची तपासणी केली असता, बॉम्ब सदृश कोणतीही वस्तू आढळून आली नाही. विमानतळ पोलीस ठाण्यात अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली. विमानतळ पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा