*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
दसरा आला ,माझा पाला तोडुन मला उघडे बोडके करू नका.. माझी आर्त हाक ऐका!!. आपटा पानांचा औषधी उपयोग. सोन्याला मोल नाही..सोने घ्या,सोन्यासारखे. सोने फेकु नका...आपट्याच्या पानांचा उपयोग पुढील त्रासांसाठी १ -
लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो, फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् खराब. ह्या त्रासावर आपट्याच्या पानांचे पाणी उपयोगी पडण्याची शक्यता आहे.
२ -ही पाने फक्त दसऱ्याला मिळतात. ती साठवून ठेवून रोज दोन पाने गरम पाण्यात टाकून गार झाले की थोडेथोडे पिऊन पहावे.
पडजीभेला फायदा होईल . ३ -एक पान तोंडात तासभर धरून ठेवले तर तोंडाचे आजारावर उपयोगी आहे .
४-आपट्याची पाने दसऱ्यालाच का? फक्त आपट्याचीच पाने कां? इतर पाने (तुळस, माका, बेलाची पाने) का नाही चालत
आपले पूर्वज अडाणी नक्कीच नव्हते! कारण काय असावे?
ही पाने दुसऱ्याला देण्याची प्रथा आहे म्हणजे हताळली जातात म्हणजे स्पर्शाला महत्व दिले आहे. आपट्याचे पान बोटात धरून ठेवली तर स्नायुंना एनर्जी मिळते . पुढील ३०मिनीटांत हार्टचे मसल व घशावर काम करते ५ सबंध पावसाळ्याचे दिवसातकमी झालेली एनर्जी भरून येत काढण्यास आपट्याचा पानाचा उपयोग आहे . ६ - पायाला दुखत असेल तर तिथे आपटा पान ओले करून उलगडून सेलोटेपने लावून ठेवल्यास तासाभरात दुखणे कमी होते .
७ -खांद्याला दुखत असेल तेथे आपटा पान ओले करून सेलोटेपने लावून दिवसभर ठेवल्यास परत वेदना होत नाहीत .
आपट्याचे हे गुण असल्याचे पूर्वजांना माहिती असल्याने समाजाला सांगत बसण्या ऐवजी समाजाचे उपयोगासाठी आपट्याची पाने देण्याची प्रथा सुरू केली असावी असे माझे मत झाले.
दसऱ्याचे दुसरे दिवशी ही पाने कचऱ्यात टाकण्या पेक्षा साठवून ठेऊन वर्षभरात वेदना कमी करण्यासाठी जरूर वापरून पहा
८ -आपट्याच्या पानाचा उपयोग रात्री आपट्याची पाने पायाला ठिकाणी दुखावा आहे तेथे रात्री बांधून झोपल्या नंतर दुखावा पूर्ण बरा होणेस मदत होते .
९ -कंबर दुखी साठी आपट्याच्या पानाचा काढा करून,त्यात फडके ओले करून कमरेला बांधले तर कंबर दुखी बंद होते .
९-घसा दुखत असेल तर आपट्याची पाने घशाला बांधून ठेवली तर दुसर्या दिवशी त्यांना बराच फरक जाणवतो .
१०- ताप येऊन गेलेवर किंवा ताप गेल्यावर भरपूर अशक्तपणा येतो . यासाठी आपट्याच्या पानाचे चूर्ण घेतले तर एक तासाभरात त् भरपूर एनर्जी येते. ११ - आपटा पाने काढा पित्त व कफवर उपयोगी आहे १ २ - दाह तृष्णा प्रमेह यावर आपट्याच्या पानाचा काढा उपयोग होते १३ - लघवीची जळजळ थांबविण्यासाठी आपटयाच्या पानाचा काढा उपयोगी आहे . १४ - मुतखडयावर आपटा पाने काठा उत्कृष्ट कार्य करते .१५ - आपट्याचा पानाचा काढा जुलाब साठी वापरला जातो . १६ - जखमा वरील उपचार व लवकर करणेसाठी आपटा व तीळ तेल वापरले जाते .
आपटा तेल करणे - एक वाटी तीळाचे तेलात आपट्याची १५-२० पाने तळणे. गार झाले की गाळून घेऊन वापरणे हे तेल सर्व दुखावावर रामबाण उपाय आहे .तरी दसऱ्याला दिलेली आपट्याची पाने फेकून न देता ही साठवून ठेवावी व पृथ्वीवरील या हिरव्या सोन्याचा वापर आरोग्यासाठी करावा व हा ठेवा जपून ठेवण्यासाठी आपटा वृक्षाचे संवर्धन दसरा या शुभ मुहूर्तावर करण्याचा संकल्प करूया ! वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा