Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १० डिसेंबर, २०२५

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वजन काट्याची भरारी पथकाकडून तपासणी

 अकलूज प्रतिनिधी 

    केदार लोहकरे

टाइम्स 45 न्यूज मराठी


सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ चा ऊस गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने चालू असून मा.जिल्हाधिकारीसाो, सोलापूर यांनी नियुक्त केलेल्या ऊस वजन काटा तपासणी भरारी पथकाने अचानक येऊन कारखान्याच्या ऊस वजन इलेक्ट्रॉनिक काट्याची तपासणी केली.या पथकाने कारखान्याचे केनयार्ड विभागातील ऊसाचे वजन काट्यांना सिलींग योग्य व बरोबर असल्याची खात्री केली तसेच मुदतीत पडताळणी व मुद्रांकन चालू कॉर्टरमध्ये झाले आहे का ? याची तपासणी केली.त्यानंतर ऊसाने भरलेली वाहने वजने करून जी गव्हाणीकडे खाली करणेसाठी गेली होती ती वाहने परत बाहेर घेऊन त्या सर्व वाहनाचे चालक यांचेकडून वजन स्लिपा ताब्यात घेऊन सदर वाहनांची पुन्हा एकदा सर्वांचे समक्ष वजने करून वजनांच्या नोंदी घेतल्या.सर्व वाहनांची वजने तपासणीत अचूक निघाली. कारखान्याचे सर्व इलेक्ट्रॉनिक वजन काटे अचूक वजन दर्शवित असल्याचे स्पष्ट आढळून आले.

                 सदर ऊस वजन काटा तपासणी भरारी पथकास कारखान्याचे इलेक्ट्रॉनिक ऊस वजन काट्यामध्ये कोणतीही त्रुटी न आढळल्याने पथकातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले व अचूक असलेबाबत प्रमाणपत्र सादर केले. सहकार महर्षी कारखाना स्थापनेपासून ऊस वजन काट्यामध्ये कायमच चोख व अचूक असल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी यांचे विश्वासाला पात्र असून तो अजून दृढ होवून कायम राहिलेला आहे.

       या  ऊस काट्याच्या तपासणी भरारी पथकामध्ये डी.के.शेजवळ, निरिक्षक,वैद्यमापन शास्त्र, वाघोली विभाग पुणे एन.पी.उदमले उपनिरिक्षक,वैद्यमापन शास्त्र,पुणे तसेच तहसिल कार्यालय,माळशिरस व अकलूज पोलीस ठाणे चे प्रतिनिधी यांनी शेतकरी व वाहन चालक यांचे समक्ष ऊस वजन काट्याची तपासणी केली.यावेळी कारखान्याचे चिफ इंजिनिअर एस. के.गोडसे,मुख्य शेती अधिकारी आर.एस.चव्हाण,केनयार्ड सुपरवायझर सी.एस.पताळे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा