*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सदस्य पदी श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा श्री राजेंद्र गोबारे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने लातूर विभागीय शिक्षण समितीचे अशासकीय सदस्य म्हणून प्रा राजेंद्र गोबारे यांची नियुक्ती केली आहे प्रा गोबारे हे गेली तीस वर्ष श्री सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयात कुशल विद्यार्थी, इंजिनियर्स व अनेक क्षेत्रातील उच्चशिक्षित विद्यार्थी घडवण्याचे कार्य केले आहेत तसेच संघटन कौशल्य हा त्यांचा अभिजीत गुण आहे व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे त्यांच्या या शैक्षणिक सेवा कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने त्यांची नियुक्ती सदर पदी केली आहे
या निवडीबद्दल त्यांचा सत्कार प्रियदर्शनी बहुउद्देशीय संस्था बेंबळीचे अध्यक्ष श्री अनिल अण्णा गिरवलकर, उपाध्यक्ष जयसिंग फणसनाळे ,सचिव भाऊसाहेब पाटील, कोषाध्यक्ष विजय भोसले ,सदस्य राहुल गिरवलकर यांनी केले त्यावेळी संस्थाध्यक्ष श्री अनिल अण्णा गिरवलकर यांनी सरांचे कौतुक करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तर विजय भोसले यांनी शुभेच्छा देऊन इयत्ता अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य श्री काशिनाथ आरळे सर, खापरे मॅडम ,गिरवलकर मॅडम, बंडू फसके, रजाक शेख ,मोहन पाटील, मधुसूदन तानवडे ,सुरेश मोटे, शिवाजी स्वामी, आशुतोष होळे व इयत्ता अकरावी बारावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खालिक शेख सर यांनी केले तर आभार श्री सागर गिरवलकर यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा