*अकलूज---- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
खुडूस ता.माळशिरस येथील" चैताली संतोष कांबळे "हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्यू समई तिचे वय २० वर्ष होते
त्या पाणीव येथील नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्या खुडूस ते पाणीव कॉलेजला पायी जात होत्या त्यांची बहीण मेडिकल कॉलेजला असल्यामुळे तिच्याही शिक्षणाच्या खर्चाचा भार चैताली वर होता त्यामुळे त्या शिवाजीनगर अकलूज येथील शिंदे हॉस्पिटल मध्ये पार्ट टाइम मध्ये काम करत होत्या येणाऱ्या पगारातून बहिणीचे शिक्षण आणि रोजी रोटी चा प्रश्न मिटवणे मुश्किल होते तरीपण परिस्थितीचा सामना करत त्या बहिणीला मेडिकलचे शिक्षण देत होते तिच्या या कष्टाला पाहून खडूस मधील जनता त्यांचे कौतुक करत होते परंतु आकस्मित हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने खुडूस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा