Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

*हरियाणा निकालावरून सर्व विरोधी पक्षांनी" सावध" राहावे हाच एकमेव उपाय!*


 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला( पत्रकार )*

 *सांगली*

*मो:-8983 587 160*

हरियाणामध्ये मतमोजणी आधी गेल्या 3 दिवसापासून स्ट्रॉंगरूम मध्ये असणारी EVM मशिन्स अचानक 99 %  चार्ज कशी दाखवतात ??? स्ट्रॉंग रूम मध्ये निवडणूक आयोगाच्या "परवानगी" शिवाय कोणीच जाऊ शकत नाही तथापि आज निवडणूक आयोग हे  सत्ताधारी भाजपा आणि मोदी सरकारचे बाहुले बनले आहे का ?



EVM मशीन मध्ये हेराफेरी करून एखाद्या  राजकीय  पक्षाला अथवा उमेदवाराला जास्त. मतदान देणे हे केवळ 10 सेकंदाचे कामं असते, आणि हरियाणा मध्ये हा "खेळ" निश्चितपणे झाला असेल.

मतमोजणी वेळी, तब्बल  3 दिवसानंतर EVM मशिन्स "स्ट्रॉंग रूम"  बाहेर काढल्यानंतर पूर्णपणे चार्जे* असणे आणि प्रारंभी टपाली मतदानात 90 उमेदवारांपैकी  काँग्रेस चे 78  उमेदवार पुढे असतात  आणि त्यानंतर 2 तासांनी काँग्रेस पिछाडीवर जाते, याचा अर्थ काय ??? दुसरी बाब जी EVM मशीन चार्जे होती त्यामध्ये भाजपा उमेदवाराला 80% पेक्षा जास्त मते पडतात आणि जी  EVM  मशिन्स 50-60 % चार्जे होती  त्यात काँग्रेस ला 65% पेक्षा जास्त मतदान होते ..याचा अर्थ हा आहे की सरळसरळ "भाजपने" निवडणूक आयोगाला "हातात" धरून, संगनमत करून हरियाणा मध्ये जनतेच्या "इच्छा -आकांक्षाला" सुरुंग लावला आहे. हरियाणामध्ये आज लोकशाहीचा खून झाला आहे. 

हा काँग्रेसचा "पराभव"नव्हे तर लोकशाही आणि जनतेचा पराभव झाला आहे.  हरियाणाची लढाई पक्षीय नव्हतीच,, तर  ती होती भाजपा विरुद्ध सर्वसामान्य जनता अशीच होती.

आजचा दिवस भारतीय इतिहासात काळा दिवस म्हणून ओळखला जाईल यात शंका नाही.

ज्या हरियाणा मध्ये ग्रामीण भागात भाजपा उमेदवाराला "प्रवेश" नव्हता ,जेथे भाजपा उमेदवाराला जनता - मतदार हाकलून लावत होते, प्रचाराला येऊ देत नव्हते ,तेथे भाजपचे उमेदवार कसे निवडून येतात ???





ज्या मोदी आणि अमित शहा यांच्या सभेत शेकडो खुर्च्या रिकाम्या असतात,ज्यांच्या सभेला 22 विधानसभा क्षेत्रातून गर्दीसाठी माणसे बोललावी लागतात, ज्या मोदी यांच्या कश्मीर च्या सभेत 300 लोक जमतात ,त्या भाजपचे उमेदवार कसे निवडून येतात ??? ज्या मनोहरलाल खट्टर या मुख्यमंत्र्याला विवाहाच्या हॉल मध्ये सभा घ्याव्या लागल्या ,ज्यांचा फोटो  प्रचारात लावलेला नव्हता,जेथे शेतकरी मजूर,कष्टकरी,युवक ,बेरोजगार,खाजगी -सरकारी कर्मचारी यांचा प्रचंड विरोध होता ,जेथे महिला  कुस्तीगीर यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले,ज्या हरियाणा च्या 746 शेतकऱ्यांचे बळी गेले ,त्यांना जेथे लाठ्या - काठ्या मारल्या गेल्या, संपूर्ण हरियाणा मध्ये मोदी आणि भाजपा विरोधी लाट नव्हे तर सुनामी होती अशा हरियाणा मध्ये भाजपचा विजय कसा होतो ??? ज्या हरियाणा मध्ये 12 पैकी *9* विद्यमान मंत्री पराभूत होत असतील तेथे लाट कोणत्या बाजूने आहे हें सांगण्याची "गरज" आहे का ??? 

याउलट काँग्रेस च्या सभेत पैसे न देता "स्वखुशीने" लोक जमत होते,हजारो लोकांच्या साक्षीने "सभा" संपन्न झाल्या तेथे काँग्रेस चा "पराभव" होतो हें पटतं नाही. आज देखील बॅलेट पेपर* वर मतदान घेतल्यास भाजपाला 10 जागा मिळणे देखील "दुरापास्त" असेल.

 हरियाणा निवडणुकीत जेथे - जेथे भाजपचा उमेदवार कमजोर आहे तेथे अपक्ष. उमेदवाराला रसद , पैसा आणि सर्वोतोपरी मदत करून अपक्ष उमेदवाराला मदत करून काँग्रेस ला पडणारी मते अपक्षाला वळवून घेणे ही क्लुप्ती देखील केली गेली. मतविभागणीचा फायदा भाजपा उमेदवाराला काहीप्रमाणात  झाला.

त्याशिवाय खासदार कुमारी शैलजा आणि मुखमंत्रीपदाचे दावेदार खट्टर यांच्यामध्ये असणाऱ्या शीतयुद्धाचे परिमाण काहीप्रमाणात काँग्रेस ला "भोगावे" लागले आहेत. त्याशिवाय "राहुल गांधी" यांनी 10 ठिकाणी निवडलेले "चुकीचे उमेदवार" काँग्रेसचा पराभव करण्यासाठी "पूरक" ठरले आहे. प्रभारी वेणुगोपाल यांच्या मनमानी कारभारामुळे काही जागा काँग्रेस ने गमावल्या. राजकीय पक्षाला केवळ  गर्दी ,हवा,आणि सहानुभूती असून फायदा नसतो तर मतमोजणी ठिकाणी उमेदवाराने  स्वतः विजयी सर्टिफिकेट  मिळेपर्यंत तेथे थांबणे ,EVM मशीन चे चार्जिंग  पाहणे,कुठल्या क्षेत्रात किती मतदान होते आणि प्रत्यक्षात किती झाले ?? हें पाहणे महत्वाचे असते. 

लोकसभेला काही मतदारसंघात 5-7 लाख मतदान जास्त झाले ,असे असताना देखील लोकसभेत 241 जागाच भाजपाला मिळवता आल्या. EVM मध्ये हेराफेरी आणि मतमोजणी मध्ये जाणीवपूर्वक भाजपाचे पूरक सरकारी कर्मचारी ठेवणे,केंद्रीय निवडणूक आयोगाची साईट बंद ठेवणे ,असे प्रकार लोकशाहीला घातक आहेत.

आज हरियाणा मध्ये जो कलंक लागला आहे त्याचे पडसाद आगामी महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये पाहावयास मिळतील. आता सर्व विरोधी पक्षांनी "सावध" राहणे हाच एकमेव उपाय आहे. त्याशिवाय EVM वर कायमस्वरूपी बंदी आणणे अतिशय महत्वाचे आहे.अन्यथा अशाच प्रकारे निवडणुका हॅक केल्या जातील आणि सर्वसामान्यांच्या विचारधारा आणि "मते" यांना काडीमात्र किंमत राहणार नाही .


 *इकबाल  बाबासाहेब  मुल्ला*

(*पत्रकार* )

संपादक - सांगली वेध,

संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा