Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

डाळजकरांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचे घोड्यावरून केले जंगी स्वागत आणि जेसीबीतून केली पुष्पवृष्टी !

 


*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147

----- अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा इंदापूर तालुका जन संपर्क दौरा चालू आहे. तालुक्यातील ठीक ठिकाणांहून त्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे. त्यांच्या जनसंपर्क दौऱ्याला गावा गावातील जनता भर भरून प्रतिसाद देत आहेत.

    प्रवीण माने डाळज नं २ गावी गेले असता त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांची घोड्यावरून जंगी मिरवणूक काढण्यात आली. तर जेसीबीतून पुष्पवृष्टी करून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रविण माने यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन महाराजांना वंदन केले. त्यांनी जनतेने केलेल्या स्वागताचे आभार मानत आपल्यावर असेच प्रेम राहावे अशी भावना व्यक्त केली.



   प्रविण माने बोलताना म्हणाले, मी आमदार पदाचा उमेदवार नसून आपण सर्व उमेदवार आहोत या भावनेने मतदान करा. कोणाच्या दबावाला तसेच अमिषाला देखील बळी पडू नका. तालुक्यातील युवकांच्या हाताला प्रथम काम द्यावे लागेल. तरच तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास होईल. तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पाण्याच्या संदर्भातील समस्या दिवसं-दिवस बिकट होत चालली आहे. आजही २२ गावाचा प्रश्न तसाच आहे. याच्यावर केवळ आणाभाका व वल्गना केल्या जातात. आपण आरोग्य सभापती असताना आपल्या प्रयत्नातून जेवढी आरोग्य सुविधा निर्माण केली तर काही ठिकाणी थोडा विलंब झालेला देखील असेल पण प्रयत्न मात्र नक्की केले.



     तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न हेच आपले पहिले प्राधान्य असेल कारण तालुक्यातील पाण्याची समस्या सुटली तरच शेतकरी आणि सामान्य नागरिक यांच्या समस्या सुटली तर तालुका सुजलाम् सुफलाम् होईल. त्यामुळे भविष्यात कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही तसेच शेतकरी आणि कष्टकरी स्वयंभू होईल.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा