*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माळीनगर येथील दि.सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड या कारखान्याच्या व्यवस्थापनाने गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गळितास आलेल्या ऊस उत्पादकांना दिपावली सणानिमित्त सभासदांची दिपावली गोड करण्याकरता प्रति टन १५० रूपयाप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे.पहिला हप्ता २६००/- अधिक आता दिलेला १५०/- असे एकूण २७५०/- आज रोजी दिले आहेत.सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा देत असतानाच माळीनगर कारखान्याच्या प्रति कायमस्वरूपी विश्वास ठेवून आपला ऊस दि सासवड माळी साखर कारखान्याकडे संपूर्णपणे द्यावा अशी अशा कारखाना व्यवस्थापनाने व्यक्त केली व दि सासवड माळी साखर कारखाना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचाच सुरुवातीपासून विचार करीत असताना वजन काटा पारदर्शक,राजकारण विरहित कामकाज व गळीतास आलेल्या ऊसास प्रत्येक वर्षी चाचणी हंगामापासून चांगला दर देणारा कारखाना हा नावलौकिक कायम ठेवण्याचे काम कारखाना व्यवस्थापनाने केले आहे उत्कृष्टपणे व काटकसरीने चालवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा