*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*
"मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेने या विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांना बिनशर्त पाठिंबा रविवार दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी भरणेवाडी येथील आमदारांच्या निवासस्थानी दिला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे , संघटनेचे सचिव अनिल केंगार, राजशिष्टाचार समितीचे आप्पासो कदम, नागेश भोसले,मिलिंद भोसले, तालुका अध्यक्ष सतीश वाघमारे, समाधान भोसले, अशोक मिसाळ , बबलू वंचाळे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
इंदापुर तालुक्याच्या ८० गावात संघटनेचे जाळे असुन संघटनेला मानणारे कार्यकर्ते आहेत. संघटनेकडे निर्णायक मते असुन त्याचा फायदा दत्तात्रय भरणे यांना होणार आहे.
विद्यमान आमदारांनी तालुक्यात अनेक गावांमध्ये बुध्दविहार बांधण्यासाठी निधी, बुध्दविहार सुशोभीकरणासाठी निधी, अनेक दलित वस्त्यांमध्ये सामाजिक सभागृहांना निधी, अभ्यासिकांसाठी निधी,दलित वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्त्यांसाठी निधी,बंदिस्त गटार योजनांसाठी निधी,बौद्ध विहारांच्या स्वागत कमानीसाठी निधी ,प्रकाश व्यवस्थेसाठी निधी,लासुर्णे येथे भव्य संविधान भवन बांधण्यासाठी भरघोस ३ कोटींचा निधी दिला आहे. म्हणूनच संघटनेने बिनशर्त पाठिंबा दिला असून संघटनेचे प्रमुख पदाधिकारी सर्व इंदापूर तालुक्यात गावभेट दौरा करणार असुन जास्तीत जास्त मतदान दत्तात्रय भरणे यांना देण्यासाठी मतदारांना विनंती करणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा