*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
पुर्वीच्या काळी प्रगत तंत्रज्ञान नसल्यामुळे सर्वसामान्य माणसांचा भारतीय टपाल खात्याच्या सेवेवर पुर्ण विश्वास व भरवसा असायचा.त्याकाळात पोस्टमन व सर्वसामान्य माणूस यांचे वेगळेच ऋणानुबंध होते व माणसांशी बांधलेले घट्ट नातं निर्माण झाले होते.त्याकाळी एक पाठविलेले पत्र चार-आठ दिवसांनी एखाद्या व्यक्तीला मिळाले.ते पत्र वाचून त्या माणसाच्या चहे-यावर एक वेगळा आनंद दिसत होता. त्यावेळी एखाद्या पोस्टमन गल्ली पत्र वाटत असला तरी संपुर्ण गल्लीतील माणसं आपले पत्र आले असेल का म्हणून कधी दारात उभारून पोस्टमनची वाट बघत असायचे आणि कधी एकदा येऊन हात टपाल देईल याची उत्कंठा त्याकाळात खूप दिसत होती.आज काळ बदलला आहे.आधुनिक युग सुरू झाले आहे.नेट,इंटरनेट,मोबाईलचे युग आले आहे.अधुनिक जमान्यात दूरवरचा माणूस जवळ आला आहे पण शेजारचा व जवळचा माणसं लांब गेला आहे. त्याकाळातील पोस्ट खात्याची जलद सेवा म्हणजे तार (टेली ग्राम) असायची पण त्याकाळात तार घेऊन पोस्टमन घरी आला की सर्व कुटुंब टेन्शनमध्ये असायचे एखादी दुःखद घटना घडली तर जलद सेवा म्हणून लोकं तार करायचे.आजच्या मोबाईलच्या आधुनिक युगात दिल्ली घडलेली दुर्घटना गल्ली काही क्षणातच व्हायरल होते.त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माणसं ही माणूसकी विसरून चालली आहेत.पुर्वीच्या काळी आठ-दहा ओळीचे पत्र माणसांच्या मनाला खूप आनंद व समाधान देऊन जात होते पण आज मोबाईलवरून तास अन् तास बोलून ही माणसांच्या मनाचे समाधान होत नाही आहे.शेवटी जुनं ते सोनं म्हणायची वेळ आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा