Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

सणसर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न


 

इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

------

इंदापूर तालुक्यातील सणसर येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रवीण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास सणसरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली. सणसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सकाळी १० ते ५ या वेळेत ७०३ नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली असून यातील ४२७ नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले तर १८ नागरिकांची पुणे भारती विद्यापीठ येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 


गेले ४ दिवस तालुक्यातील विविध गावांतून हे नेत्र तपासणी शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न होत असून, संपूर्ण तालुकाच मोतीबिंदू आजार मुक्त करण्याचा निर्धार आपण केला असल्याचे प्रतिपादन यावेळी  माने यांनी केले


सणसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे हनुमंत जाधव, अतुल सूर्यवंशी व राहुल पवार यांनी आयोजन केले होते तर कार्यक्रमाची नियोजनाची जबाबदारी निलेश रंधवे, छगन बनसुडे व अंकुश दोरकर यांनी पार पाडली.


या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनिकेत निंबाळकर, बजरंग रायते, अतुल सूर्यवंशी, सुरज जाधव, डॉ. शरद शिर्के, गौरव काळे, हसनभाई, नाना निंबाळकर, दिलीप शिंदे, सागर गुणे, नंदकुमार रायते, चव्हाण मेंबर, हनुमंत चव्हाण, गणपत कदम, लक्ष्मण पवार व आशा भगिनी, डॉक्टर्स, ग्रामस्थ व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा