इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- --- आश्विन शुध्द प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो. तर समाप्ती विजयादशमीला दसरा साजरा करुन करण्यात येतो. त्यानिमीत्त आदिशक्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी तुळजापूर, कोल्हापूर, माहुरगड तसेच काळुबाई येथून भवानी ज्योती आणल्या जातात. तसेच घरोघरी घटाची स्थापना आजच्या शुभमुहूर्तानुसार सकाळ पासूनच करण्यात येते. तर भवानी ज्योतींचे मार्गावरील गावांतून ठिकठिकाणी मोठे उत्साहात स्वागत करण्यासाठी महिला व नागरिकांनी गर्दी केली होती.
नवरात्रोत्सोव सुमारे तीन हजार वर्षापासून देवीचं नवरात्र करीत असल्याचे अनेक संदर्भ आढळतात. आश्विन महिन्या प्रमाणेच चैत्र महिन्यात देखील देवीचं नवरात्र असून ते चैत्री पोर्णिमेपर्यत असते. आश्विनातील नवरात्रात दुर्गापूजा केली जाते. ही तेजस्वरुपाची, शक्तीची उपासना आहे. पुजेच्या विविध पध्दती विविध ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात. या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात. नवरात्रात देवीजवळ अखंड दिवा लावला जातो. नवरात्र पूजेतील महत्वाचा भाग म्हणजे ही तेलवात नऊ दिवस - रात्र तेवत राहण्यासाठी विशेष प्रकारे बनवली जाते त्यालाच भवानीज्योत असे संबोधण्यात येते.
आजपासून नवरात्र उत्सवास प्रारंभानिमीत्त गावोगावच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी जाऊन भवानी ज्योती मध्यरात्री प्रज्वलीत करुन धावत घेवून येतात. जवळपास १५० ते २०० किलोमीटरचे अंतर मंडळाचे कार्यकर्ते एकमेकांच्या सहाय्याने पळत पुर्ण करतात. आज तुळजापूर, कोल्हापूर, माहुरगड, काळूबाई येथून आलेल्या भवानी ज्योंतींचे ठिकठिकाणी महिला तसेच नागरीकांनी उत्साहात स्वागत केले. तुळजापूर येथून आलेल्या भवानी ज्योतींचे नरसिंहपूर, आडोबावस्ती, टणू, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, बावडा गावात महिलांनी ज्योती मध्ये तेल ओतून हळदी कुंकू वाहून स्वागत करुण भवानी ज्योतींची ठिकठिकाणी पुजन करण्यात आले.
भवानी ज्योती प्रत्येक वर्षी ठरल्याप्रमाणे या परिसरातून जात असल्याने नागरीक सकाळपासून त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर थांबले होते. बावडा नरसिंहपूर रस्त्याची कोट्यावधी रुपयांची निधी खर्चून रस्त्याचे काम करण्यात आले आहे. परंतु अद्यापही बावडा - नरसिंहपूर रस्त्याच्या दुतर्फा काटेरी कुभाबळी वाढल्या असल्याने भवानी ज्योती घेऊन अनवाणी पळताना तोंडाला लागत असल्याने त्रास होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन झाडे तोडण्याची काम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
फोटो - गणेशवाडी येथे बावडा नरसिंहपूर मार्गाने जाणारे भवानी ज्योतीचे स्वागत करण्यात आले.
------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा