*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
श्री तुळजाभवानी देविजींचे पुजेचे दर निश्चित करणेबाबत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूरच्या वतीने
१) अध्यक्ष श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ तुळजापूर
२) अध्यक्ष श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ तुळजापूर
३) अध्यक्ष श्री तुळजाभवानी उपाध्ये पुजारी मंडळ तुळजापूर
यांनी दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर च्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकाद्वारे केली आहे
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणांस सूचित करण्यात येते की, महाराष्ट्राची कुलस्वामिनी संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील आंध्रप्रदेश, तेलंगाणा व कर्नाटक या राज्यातील बहुतांश कुटुंबियांची कुलदेवता असल्याने याठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात.
श्री तुळजाभवानी देविर्जीचे कुलाचार व कुलचर्म म्हणून मंदिरामध्ये सिंहासन, अभिषेक पूजा, ओटीभरण, जावळ, गोंधळ व इतर धार्मिक विधी, पूजा-अर्चा पुजारी बांधवामार्फत करण्यात येत असते. सदर धार्मिक विधी पुजारी बांधवांमार्फत होत असल्याने सदर विधीकरिता संबंधित भाविकांकडून पुजेचे दराबाबत जास्तीच्या रकमेची मागणी होत असलेबाबत मंदिर प्रशासनाकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच याबाबत गेल्या काही दिवसात काही पुजारी यांनी पुजेसाठी अवाजवी पैश्यांची मागणी केल्यामुळे बच्चीवर गुन्हे दाखल होण्याच्या घटना देखील समोर आल्या जाहेत. तसेच प्रसार माध्यमांतून याबाबत प्रसिध्दी होत आहे व भाविकांकडून पुजारी वर्गाबाबत नाराजी व्यक्त होत असून त्यामुळे सर्व तुळजापूर देवस्थान संबंधीत वर्गाची बदनामी होत आहे.
त्या अनुषंगाने श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी बांधवांमार्फत होत असलेले धार्मिक विधींचे योग्य ते पूजेचे दर निश्चित करणे आवश्यक आहे. याकरिता आपले तिन्ही पुजारी मंडळामार्फत पुजेचे दर निश्चित करुन त्याबाबतचा तक्ता तयार करुन मंदिर प्रशासनाकडे देण्यात यावा.
याबाबत पुजेच्या दरासंदर्भाने चर्चेकरीता दिनांक 22/11/2024 रोजी सकाळी दुपारी 1.00 वाजता मंदिर प्रशासकीय कार्यालय, श्री तुळजाभवानी मंदिर संत्वान, तुळजापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी सदर विषयाच्या अनुषंगाने चर्चेकरिता उपस्थित रहावे.
तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर
माहितीस्तव ही प्रत खालील मान्यवरांना देण्यात आली असून त्यांनाही उपस्थित राहण्याचे आवाहन तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे
1) मा. जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर.
2) मा. उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त सदस्य, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर
3) मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, तुळजापूर यांनी सदर बैठकीस उपस्थित राहून सहकार्य करावे, ही विनंती.
4) प्रभारी पोलीस अधिकारी, मंदिर पोलीस चौको, तुळजापूर मी सदर बैठकीस उपस्थित राहून सहकार्य करावे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा