*संपादक--- हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अशोक जगदाळे यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते मात्र आता त्यांनी तुळजापूरचे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार धीरज पाटील यांना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. , आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून त्यांनी धीरज पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतला असून
गुरुवारी दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी नळदुर्ग येथे अशोक जगदाळे यांच्या उपस्थितीत
तुळजापूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटप्रमुख, गणप्रमुख तसेच राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार गट) पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संवाद बैठक पार पडली. यामध्ये अशोक जगदाळे यांनी नाराजी दूर करत तुळजापूर विधानसभेसाठी महाविकास आघाडीच अधिकृत उमेदवार कुलदीप उर्फ धीरज आप्पासाहेब पाटील यांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना एकजुटीने प्रचारास सुरुवात करावी, असे आवाहन करून स्वतःही ते धीरज पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी तालुक्यातील मोठ्या
प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्तेउपस्थित होते. जगदाळे यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती, मात्र ही जागा काँग्रेसला सुटल्याने जगदाळे यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. ते प्रचारात सक्रिय नसल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील यांची अडचण झाली होती. मात्र पाटील यांनी जगदाळे यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर जगदाळे यांनी आपली टीम प्रचारात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धीरज पाटील यांना ताकद मिळणार असून धीरज पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा