*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
अकलूज -डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत अंतर विभागीय क्रीडा स्पर्धा एस. एस. व्ही. पी. एस. बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, धुळे येथे पार पडल्या त्यामध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ.प्रवीण ढवळे यांनी दिली.
सदरच्या स्पर्धांमध्ये वेट लिफ्टिंग, पावर लिफ्टिंग, रेसलिंग जुडो, रायफल शूटिंग अशा विविध स्पर्धा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विविध संस्थांमध्ये पार पडल्या त्यामध्ये तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील रुद्रतेज अमरसिंह माने देशमुख या विद्यार्थ्याने वेटलिफ्टिंग व पावर लिफ्टिंग या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये १०५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला, तृतीय वर्ष कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागातील विश्वराज राजकुमार अलगुडे या विद्यार्थ्याने पावर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारांमध्ये ६६ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकाविला, सार्थक मोरे या विद्यार्थ्यांने ७५ किलो वजनी गटात पावर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारामध्ये चतुर्थ क्रमांक पटकाविला, तसेच प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागातील ओंकार भोसले या विद्यार्थ्यांने पावर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारांमध्ये ६६ किलो वजनी गटांमध्ये चतुर्थ क्रमांक पटकाविला.
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष . जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील, संस्थेचे सचिव . राजेंद्र चौगुले यांनी विशेष कौतुक केले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.
सदरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून क्रीडाशिक्षक प्रा. विकास शिवशरण यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा