*विशेष--- प्रतिनिधी*
*एहसान----मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
,*मो:-9096837451
अकलूज येथे गुरुवार दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी
7/30 च्या सुमारास परतीचा पाऊस जोरदार बरसला असून 8/30 नंतर पावसासह वादळी वाऱ्यामुळे सदुभाऊ चौक, शिवशंकर बझार जवळ आणि आंबेडकर चौक येथे "विनायक भगत "यांच्या किराणा दुकानावर झाड उन्मळून पडल्याने. मोठे नुकसान झाले आहे मात्र दैव बलवत्तर कुठलीही जीवित हानी झाली नाही
दीपावलीनिमित्त बाजारपेठेत विविध वस्तूंची आणि पूजनाच्या साहित्यांची दुकाने थाटली असून अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसा मुळे एकच गोंधळ उडाला असून अनेकांच्या मालाचे पावसामुळे नुकसान झाले आहे "दुष्काळात तेरावा महिना "या म्हणीप्रमाणे मुळातच वाढत्या महागाईमुळे बाजारपेठेत मालाला उठाव नसून व्यावसायिकांच्या व्यवसायाला मंदी असून अनेक व्यवसायिक चिंताग्रस्त आहेत शिवाय वाढत्या महागाईमुळे गोरगरीब जनता ही मेटाकूटीस आली असून वर्षाचा हा सण महागाईमुळे साजरे करण्यासाठी "तारेवरची कसरत "करावी लागत आहे तसेच सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचारात मग्न असून मतदारांमध्ये मात्र उत्सुकता नसून नाराजी दिसून येत आहे त्याला एकमेव कारण म्हणजे वाढती महागाई होय. सर्वच नाही परंतु कमी अधिक प्रमाणात महिलाना "मुख्यमंत्री लाडकी बहिण " योजनेचे पैसे प्राप्त झाले मात्र एकीकडे महिलांना योजनेचा लाभ मिळाला परंतु लागलीच शासना कडून महागाई वाढवून लाडक्या बहिणी कडून पैसे हिसकावून घेण्याचे कृत्य केल्यामुळे लाडक्या बहिणीन मध्ये प्रचंड नाराजी दिसुन येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा