Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४

*भारताच्या हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्ज चा साठा- कोस्ट गार्डने- मुद्रापोर्ट बंदर वर पकडला*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

भारताचा समुद्र किनारा आता ड्रग्जचं आगार बनतं चालल्याचं चित्र आहे. कारण भारतीय तटरक्षक दलानं नुकत्याच केलेल्या एका कारवाईत तब्बल ५ टन ड्रग्ज पकडण्यात आलं आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एका मच्छिमारांच्या बोटमधून हे ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा साठा असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी अदानींच्या मुंद्रा पोर्टवर ३ टन ड्रग्ज पकडण्यात आलं होतं.


अंदमानच्या समुद्र क्षेत्रात तटरक्षक दलानं ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे मच्छिमारांच्या बोटमधून हा ड्रग्जचा साठा पकडण्यात आला आहे. त्यामुळं कोणालाही संशय येऊ नये, अशा प्रकारे हे ड्रग्ज भारतीय भूमीवर आणण्याचा तस्करांचा डाव उधळण्यात आला आहे.


दरम्यान, यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये डीआरआयनं मुंद्रा बंदरात दोन कंटेनर भरुन आणलेला ड्रग्जचा साठा पकडला होता. यामध्ये तब्बल ३००० किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. अफगाणिस्तानातून हे हेरॉईन भारतात पाठवण्यात आलं होतं. ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २१,००० कोटी रुपये इतकी होती. ही भारतातील सर्वात मोठी कन्साईन्मेट मानली जात होती.


त्यानंतर ३१ जानेवारी २०२३ पुन्हा एकदा मुंद्रा पोर्टवर ३७५.५० कोटी रुपयांचं ७५ किलो इतकं हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. मुंद्रा पोर्ट लिमिटेड, हा भारत सरकारचं सर्वात मोठं बंदर असून आणि हे बंदर अदानी समुहाचा भाग आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा