*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वालचंदनगर येथे " साद फाऊंडेशन इंदापूर " या चॅरिटेबल ट्रस्ट (एनजीओ)च्या वतीने संविधान सन्मान दौड मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ ते १०:३० या वेळेत संपन्न झाली.
प्रमुख अतिथी म्हणुन वालचंदनगर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक टेळकीकर साहेब, भारत चिल्ड्रन्स ॲकॅडमी चे प्रिन्सिपल कृष्णदेव रामराव क्षीरसागर सर, श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर चे प्राचार्य कुंभार सर, वालचंद विद्यालय कळंब चे प्राचार्य अर्जुन सर, पवार सर, ठोंबरे सर, लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रज्ञा लोंढे , विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे डांगे सर, वर्धमान विद्यालयाचे उपप्राचार्य निकम सर, बीसीए चे अमोल गोडसे सर, श्रीमती आशा रणवरे मॅडम, रणसिंग कॉलेज च्या बनसोडे मॅडम, कपिल कांबळे सर, श्री डॉ . पाखरे सर, वालचंदनगर पोलीस स्टेशन चे प्रमोद बनसोडे, तसेच अनेक शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
प्रचंड उत्साहात झालेली ही स्पर्धा चार गटांत झाली.
*१७ वर्षांवरील मुलांच्या गटात*
१) प्रतिक महेश घोरपडे
२) शाहिद ताजुउद्दीन मुलाणी
३) सुरज सतीश तुपे
यांनी क्रमांक पटकावले तसेच
*१७ वर्षांखालील गटात*
१) यश प्रसाद कुलकर्णी
२) शंकर दत्तु यादव
३)आर्चित अमोल कडुदेशमुख
या मुलांनी क्रमांक पटकावले.त्याचप्रमाणे
*१७ वर्षांवरील मुलींच्या गटात*
१) कु.दिक्षा सोमनाथ लोहार
२) कु. तपस्या राजेंद्र फरतडे
३) कु. चैतन्या संतोष गायकवाड
यांनी बक्षिसे मिळवली तर
*१७ वर्षांखालील मुलींच्या गटात*
१) शर्वरी सचिन सावंत
२) अंजली महेशकुमार लावंड
३) अंकीता अनिल वाघेला
यांनी क्रमांक पटकावले.
*उत्कृष्ट नियोजन,चोख बंदोबस्त , प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर्णे यांची तप्तर सेवा, अनेक शाळेच्या शिक्षकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाविषयी प्रचंड आवड* या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेच्या सुरवातीला संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करून सुरवात झाली. मान्यवरांच्या हस्ते संविधान पुस्तकिचे पुजन व दिपप्रज्वलन केले. तसेच यावेळी राष्ट्रगीत झाले व नंतर टेळकीकर साहेबांनी उद्देशिका वाचन करून सगळ्यांना ग्रहीत केले .
एकुण ९ विद्यालय, महाविद्यालय यांमधील ३५० धावपटुंनी सहभाग घेतला. यावेळी मुलामुलींच्या मोठ्या १७ वर्षांवरील गटातील विजेत्या धावपटुंना प्रथम क्रमांकास प्रत्येकी रोख २५०० व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकांस प्रत्येकी रोख २००० व प्रमाणपत्र तसेच तृतीय क्रमांकास रोख १५०० व प्रमाणपत्र देण्यात आले...तर १७ वर्षांच्या खालील मुलामुलींच्या गटातील धावपटुंना प्रथम बक्षीसासाठी रोख २००० रू व प्रमाणपत्र, दुसऱ्या क्रमांकास प्रत्येकी १५०० व प्रमाणपत्र तसेच तृतीय क्रमांकास प्रत्येकी १००० व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटुस सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरज वनसाळे, संचालक आप्पासाहेब कदम, सौरभ धनवडे, यश मोरे, सतीश वाघमारे, बबलू वंचाळे, क्षितीज वनसाळे, स्वयंसेवक, कर्मचारी, सचिव यांनी मेहनत घेतली. आणि वालचंदनगर पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद लुटला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा