Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

*सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यांमध्ये डिस्टिलरी व ऍसिटिक ऍसिड प्रकल्प उत्पादनाचा शुभारंभ*


 

*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

शंकरनगर-अकलूज येथील 

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये सन २०२४-२५ चा डिस्टीलरी व ॲसेटीक ॲसिड प्रकल्प उत्पादनाचा शुभारंभ आज करण्यात आला. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला.

       सदर डिस्टीलरी व ॲसेटीक ॲसिड प्रकल्प उत्पादनाचा शुभारंभा निमित्त आज सकाळी श्री सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक संग्रामसिंह अजितसिंह जहागिरदार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.याज्ञसेनादेवी संग्रमासिंह जहागिरदार या उभयतांचे शुभहस्ते संपन्न झाली.

         या प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख,संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, संचालक लक्ष्मण शिंदे, नानासाहेब मुंडफणे,रामचंद्र सिद,विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे,डॉ.सुभाष कटके,रामचंद्र ठवरे,तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख,सौ. हर्षाली निंबाळकर तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख तसेच कामगार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा