*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
सोलापुरात नई जिंदगी भागात महालक्ष्मी नगर येथे महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी, बागवान सोशल फाउंडेशन, व मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने ज्येष्ठ समाजसेवक व समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणारे समाजसेवकांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बार्शीचे बागवान सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटीचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख, मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सोलापूर जिल्हा सचिव -"जुबेर भाई बागवान" यांच्या वतीने महालक्ष्मी नगर येथील एका अपंग व्यक्तीला तीन चाकी सायकल देण्यात आली , त्यावेळी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख यांनी जुबेर भाई बागवान यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
त्यावेळी कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत बार्शीचे जुबेर भाई बागवान यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटीचे जिलानी खाजा बागवान ( jk), हाजी मुस्ताक बागवान मोहळ वाले, आसिफ सलीम बागवान, जावेद भाई हाजी अब्दुल रफिक अक्कलकोट वाले, रफिक भाई शेख,
इकबाल भाई सोलापूर वाले, तोसीब शेख, सद्दाम मेहताब बागवान अक्कलकोट वाले, शहाबुद्दीन नदाफ, परमेश्वर घुमते, मंजूर भाई खानापुरे, मानव अधिकार संरक्षण संघटनेचेप्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे, जिल्हा अध्यक्ष ( आरोग्य विभाग)अकबर शेख, जिल्हा महासचिव परवेज मुल्ला, बार्शीचे शहर उपाध्यक्ष रफिक युसुफ शेख, सोलापूर शहराध्यक्ष अजहर बिजापुरे, शहर प्रतिनिधी मीर मोहम्मद खान, तसेच महालक्ष्मी नगर परिसरातील अनेक महिला ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व प्रमुख मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला यशस्वी पडण्यासाठी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा