*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, परिसरातील काही लोकांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दरम्यान, चालकाने प्रसंगावधान राखत स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतील गरोदर स्त्री आणि तिच्या कुटुंबियांना सुखरुप बाहेर काढत सुरक्षित स्थळी हलविल्याने ते थोडक्यात बचावले. या स्फोटाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याबाबात माहिती अशी की, एरंडोल शासकीय रुग्णालयातून एका गरोदर महिलेला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यायात उपचारासाठी 108 या रुग्णवाहिकेद्वारा हलविण्यात येत होते. दरम्यान, या रुग्णवाहिकेत गरोदर महिलेसह तिचे कुटुंबिय देखील होते. ही रुग्णवाहिका जळगावातील दादावाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर पूलावर असताना तिचा स्फोट झाला.
चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले कुटुंब
दरम्यान, भरधाव वेगात जळगावच्या दिशेने येत असलेल्या या रुग्णवाहिकेच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. या रुग्णवाहिचेच्या चालकाला वाहनाच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच त्याने तात्काळ रुग्णवाहिका थांबविली आणि तो ताबडतोब खाली उतरला. तसेच अजुबाजूच्या लोकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतील गरोदर महिला आणि तिच्या कुटुंबियांना खाली उतरवले सुखरुप सुरक्षित स्थळी नेले. तसेच आजूबाजूच्या लोकांना वाहनापासून दूर राहण्याचा इशारा दिला.
ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट
जळगावकडे येत असलेल्या या रुग्णवाहिकेत दोन ऑक्सिजन सिलिंडर होते. रुग्णवाहिकेत लागलेली ही आग ऑक्सिजन सिलिंडरपर्यंत पोहोचली आणि काही मिनिटांतच मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, परिसरातील घरांना हादरा बसला तसेच काही लोकांच्या घराच्या खिडक्यांचे काच देखील फुटले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, .या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. दरम्यान, रुग्णवाहिकेला आग लागणे किंवा स्फोट झाल्याच्या गेल्या काळात घडल्या आहे. नुकतीच अशी एक घटना उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात गेल्या महिन्यात घटना घडली होती. या ठिकामी पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला आग लागली आणि काही मिनिटांतच अचानक स्फोट झाला होता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा